CoronaVirus Omicron: कोरोनातून बरे झालेल्यांनाही संक्रमित करणार ओमायक्रॉन? WHO ने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 16:45 IST2021-11-29T15:58:52+5:302021-11-29T16:45:33+5:30
CoronaVirus Omicron Reinfection: ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षाही खतरनाक असल्याचे सांगितले जात आहे. WHO ने याला धोकादायक सूचीमध्ये टाकले आहे.

कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिअंट B.1.1.529 म्हणजेच ओमायक्रॉन जगासाठी धोका बनला आहे. WHO ने याला धोकादायक सूचीमध्ये टाकले आहे. ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षाही खतरनाक असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व चिंतांमध्ये रविवारी WHO ने ओमायक्रॉनबाबत महत्वाच्या गोष्टी सार्वजनिक केल्या आहेत.
WHO नुसार आधीच्या डेल्टा किंवा तत्सम व्हेरिअंटची लागण झालेल्या रुग्णांना व बरे झालेल्या रुग्णांना ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण (Omicron Reinfection) होऊ शकते.
सध्या सापडत असलेल्या रुग्णांमध्ये रिइन्फेक्शन झालेले रुग्ण आहेत. सध्या यावर खूप कमी माहिती उपलब्ध आहे. अधिक माहिती मिळण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो. तोवर लोकांना सांभाळून राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
डेल्टापेक्षा जास्त संक्रमक (Omicron Infectious Than Delta) आहे की नाही, ओमायक्रॉन व्हेरिअंट हा डेल्टापेक्षा पंधरा ते वीस पटींनी जास्त म्युटेंट झालेला आहे. तो डेल्टा व्हेरिअंटपेक्षा जास्त वेगाने संक्रमित आहे की नाही हे सांगणे कठीण आहे. सध्याच्या RT-PCR टेस्ट द्वारे हा व्हेरिअंट डिटेक्ट केला जाऊ शकतो. 30 हून अधिक म्युटेंट असल्याने पसरण्याची शक्यता अधिक आहे.
ओमायक्रॉनचा लसीवर परिणाम- (Omicron Effect On Vaccine)
ओमायक्रॉनचा लसीवर प्रभाव किती आहे ते तपासण्यासाठी डब्ल्यूएचओ टेक्निकल पार्टनर्ससोबत शोध घेत आहे. असे झाल्यास लस घेतलेल्या लोकांवर या नव्या व्हेरिअंटचा कितपत प्रभाव असेल हे समजू शकणार आहे. याची माहिती मिळण्यासही संशोधकांना काही काळ लागू शकतो. सध्या तरी लस घेतलेल्या लोकांना या व्हेरिअंटने बाधित केले आहे.
ओमायक्रॉनची लक्षणे कोणती (Symptoms Of Omicron)
ओमायक्रॉन हा गंभीररित्या एखाद्या व्यक्तीला आजारी करू शकतो किंवा नाही यावर अद्याप काही स्पष्टपणे सांगता येत नाहीय. ओमायक्रॉन ची लक्षणे अन्य व्हेरिअंटप्रमाणे असतील की वेगळी काही असतील हे अद्याप कोणालाही सांगता येत नाहीय.
दक्षिण आफ्रिकेत रुग्ण वाढले
प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. परंतु हे केवळ ओमायक्रॉन प्रकारापेक्षा संक्रमित एकूण संख्येत वाढ झाल्यामुळे देखील होऊ शकते. तरुणांमध्ये सौम्य लक्षणे दिसू शकतात, परंतु तीव्रतेची पातळी समजण्यासाठी काही दिवस ते काही आठवडे लागू शकतात.