'ओमीक्रॉन' भारतीयांसाठी नवं आव्हान; कसं सुरक्षित राहायचं?; जाणून घ्या उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 17:20 IST2021-11-28T19:44:53+5:302021-11-29T17:20:56+5:30

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉनमुळे जगातील अनेक देशात दहशत पसरली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा स्ट्रेन समोर आला आहे. डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमीक्रॉन व्हेरिएंट अधिक वेगाने पसरत असल्याने वैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
Omicron हा व्हेरिएंट भारतासाठी सतर्क राहण्याचा इशारा आहे. भारतीयांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. मास्कचा वापर करणं बंधनकारक आहे. मास्क हा तुमच्या खिशातली लस आहे. जी सध्या कोरोना काळात प्रभावी आहे असं WHO च्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या आहेत.
ओमीक्रॉनशी लढण्यासाठी विज्ञान आधारित रणनीतीची आवश्यकता आहे. सर्व वयस्कांचं पूर्ण लसीकरण, सामुहिक कार्यक्रमात जाणं टाळणं. जीनोम सिक्वेसिंग. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत बारकाईनं नजर ठेवणं. ओमीक्रॉनशी लढण्यासाठी काही उपाय वैज्ञानिकांनी सांगितले आहे.
ओमीक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक संक्रमिक असू शकतो. अद्याप अधिकृतपणे यावर काही सांगू शकत नाही. सध्या त्यावर रिसर्च सुरु आहे. काही दिवसांत या नव्या स्ट्रेनबाबत आणखी माहिती समोर येऊ शकते असंही सांगण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, इस्त्राईलसह ८ देशात कोरोनाच्या या घातक व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारी म्हणून अनेक देशांनी आफ्रिकाहून येणाऱ्या उड्डाणावर बंदी घातली आहे. कोरोनाच्या ओमीक्रॉन व्हेरिएंटचे आतापर्यंत सर्वात जास्त ३२ म्यूटेशनची माहिती समोर आली आहे.
कोरोनाचा हा व्हेरिएंट सहजपणे मानवी शरीरात लसीमुळे निर्माण झालेल्या इम्युनिटी सिस्टमवर हल्ला करु शकत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे नवा स्ट्रेन केवळ लसीकरण न झालेल्यांनाच नव्हे तर ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत त्यांच्यासाठी आव्हान घेऊन आला आहे.
कोरोनाच्या या व्हेरिएंटपासून वाचवण्यासाठी लोकांनी विशेष काळजी घ्यावी. सध्या मास्क हा कोरोनापासून बचावासाठी पर्याय आहे. सर्व लोकांनी मास्कचा वापर कोरोना काळात करणं बंधनकारक आहेक. अँन्टीबॉडीजचा चकमा देण्यास ओमीक्रॉन व्हेरिएंट यशस्वी ठरत आहे.
कोरोनाचा धोका त्याच लोकांना आहे ज्यांचं लसीकरण झालं नाही. लसीकरणामुळे गंभीर संक्रमण आणि मृत्यूच्या धोक्यापासून वाचता येते. त्याशिवाय ज्या लोकांनी इम्युनिटी कमकुवत आहेत अशा लोकांना बूस्टर डोसची आवश्यकता भासू शकते असंही वैज्ञानिकांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या या धोक्यापासून वाचण्यासाठी मास्कसोबतच लसीकरण होणं गरजेचे आहे. ज्या लोकांनी आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस घेतले नाहीत किंवा दुसरा डोस बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर डोस घ्यावा. लस आपल्याला तेव्हाच सुरक्षित ठेऊ शकते जेव्हा पूर्ण लसीकरण झालं असेल असं डॉ. सौम्या यांनी सांगितले.
कारण, दक्षिण आफ्रिकेने हा व्हेरिएंट पहिल्यांदा २४ नोव्हेंबर रोजी उघड केला, तर २६ नोव्हेंबरपर्यंत ओमीक्रॉन ५ देशांमध्ये पसरला होता. आता २८ नोव्हेंबरपर्यंत, तो किमान ११ देशांमध्ये समोर आला आहे. कोरोना व्हायरसचा ओमीक्रॉन व्हेरिएंट आतापर्यंत आफ्रिकेपासून युरोपपर्यंतच्या देशांमध्ये आढळून आला आहे.