शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काळजी वाढली! २०२१ च्या अखेरपर्यंत आहे तशीच राहणार परिस्थिती; प्रसिद्ध कोरोना तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 4:07 PM

1 / 10
कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. जगभरातील कोरोना रुग्णांनी २ कोटी ८० लाखांचा टप्पा पार केला आहे. दरम्यान अमेरिकेतील प्रख्यात शास्त्रज्ञांचा धक्कादायक दावा समोर येत आहे.
2 / 10
अमेरिकेतील प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. एथंनी फाऊची यांनी २०२१ पर्यंत जनजीवन सुरळित होणार नाही असा दावा केला आहे. फाऊची यांनी सांगितले की, कोरोना विषाणूंवर मात करण्याासाठी लस फायदेशीर ठरेल. पण त्यासाठीही काही अटी आहेत.
3 / 10
कोरोनाच्या जितक्या लसींवर सध्या काम सुरू आहे. त्यापैकी कोणत्याही एका लसीला २०२० च्या शेवटापर्यंत किंवा २०२१ मध्ये मंजूरी मिळू शकते.
4 / 10
फाऊची यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीला या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी मंजुरी मिळेल. तरिही लगेचच लस उपलब्ध होणार नाही.
5 / 10
MSNBC च्या मुलाखतीत फाऊची म्हणाले की, लसीला मंजूरी मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि वितरणाची आवश्यकता असेल.
6 / 10
२०२१ च्या शेवटी जगभरातील सर्व लोकसंख्येला लस देणं आणि त्यांना सुरक्षित करणं कितपत शक्य होईल. याबाबत सांगता येत नाही.
7 / 10
ज्या कोरोना लसींवर सध्या काम सुरू आहे. त्यापैकी जास्तीत जास्त लसी या कमी तापमान असलेल्या जागेवर ठेवाव्या लागतात.
8 / 10
फाऊंची यांनी सांगितले की लसीसाठी कोल्ड स्टोरेजची ही समस्या उद्भवू शकते. एका ठिकाणाहून इतर ठिकाणी कोल्ड स्टोरेजची चेन तयार करावी लागते.
9 / 10
अनलॉकमुळे रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणांवर होत असलेल्या गर्दीमुळेही तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. तरूणांमध्ये गंभीर आजारी पडण्याचं प्रमाण कमी असलं तरी समाजातील विविध लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागत आहे हे विसरू नये.
10 / 10
लोक कोरोनाबाबत चुकीची माहिती पसरवत असल्यामुळे व्हायरसची लढाई अजून कठीण झाली आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यAmericaअमेरिका