काळजी वाढली! कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या एंटीबॉडीबाबत तज्ज्ञांचा चिंताजनक दावा

By manali.bagul | Published: September 27, 2020 04:41 PM2020-09-27T16:41:44+5:302020-09-27T17:01:12+5:30

अमेरिकेत आतापर्यंत ७२ लाख लोकांना कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला असून २ लाखांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास ९० टक्के लोकसंख्या कोरोनाच्या संकटांचा सामना करत आहे. ९ टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या एंटीबॉडीज दिसून आल्या आहेत.

cnbc.com च्या रिपोर्टनुसार अमेरिकेतील सीडीसीचे डायरेक्टर रॉबर्ड रेडफिल्ड यांनी सांगितले की, ९० टक्के लोकांना व्हायरसचा धोका अजूनही आहे. शुक्रवारी वैद्यकिय नियतकालीन लॅसेन्टमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार अमेरिकेत हर्ड इम्यूनिटी तयार होण्यासाठी खूप वेळ आहे. हा अभ्यास अन्य देशांची चिंता वाढवणारा ठरणार आहे. कारण अनेक देशांमध्ये कोरोनाची लाट अमेरिकेच्या आधीच आली होती. त्या देशांच्या लोकसंख्येला कोरोनाचा धोका असू शकतो.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या एकूण ४६ राज्यांमधील २८, ५०० रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यात असं दिसून आलं की, फक्त ९ टक्के लोकांमध्येच कोरोनाशी लढत असलेल्या एंटीबॉडीज विकसीत झाल्या आहेत. पुन्हा एकदा संक्रमण झाल्यास या कोरोनाच्या एंटीबॉडी संक्रमणापासून वाचवतील याची कोणतीही खात्री नाही.

अमेरिकेतील प्रमुख आरोग्य संस्था सीडीसीचाही या विषयावर अभ्यास सुरू आहे. आतापर्यंत हा अभ्यास प्रकाशित करण्यात आलेला नाही. सीडीसीच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार तब्बल ९० टक्के लोक कोरोना संक्रमणाचे शिकार होऊ शकतात.

आतापर्यंत फक्त १० टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या एंटीबॉडी विकसीत झाल्या आहेत. काही तज्ज्ञांच्यामते ६० टक्के लोकांमध्ये एंटीबॉडी विकसीत झाल्यास हर्ड इम्यूनिटी तयार होऊ शकते.

भारतातही दिल्लीमध्ये सर्वे करण्यात आला होता. या सर्वेनंतर दिल्ली सरकारनं दावा केला होता की जवळपास २९ टक्के लोकांमध्ये कोरोनाशी लढत असलेल्या एंटीबॉडी्ज तयार झाल्या आहेत. या सर्वेमध्ये १५ हजार नमुन्यांवर परिक्षण करण्यात आलं होतं.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार २४ तासांत 88 हजार ६०० नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 1 हजार १२४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंचा आकडा ५९ लाख 92 हजार 533 वर पोहोचला आहे.

भारतात सध्या ९ लाख ५६ हजार ४०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ४९ लाख ४१ हजार ६२८ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशात ९४ हजार ५०३ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका ब्राझिलच्या तुलनेत भारतात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक वाढत आहेत. अमेरिका पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे.