coronavirus: विषाणूमधील नव्या म्युटेशनमुळे कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढणार, मास्क, सोशल डिस्टंसिंग कुचकामी ठरणार

By बाळकृष्ण परब | Published: September 26, 2020 05:21 PM2020-09-26T17:21:26+5:302020-09-26T17:27:51+5:30

संपूर्ण जगाला जेरीस आणणाऱ्या या कोरोना विषाणूमध्ये म्युटेशन होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या जगासमोर गंभीर चिंता निर्माण झालेली आहे. दरम्यान, संपूर्ण जगाला जेरीस आणणाऱ्या या कोरोना विषाणूमध्ये म्युटेशन होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. तसेच म्युटेट झालेल्या विषाणूमुळे अनेक रुग्ण समोर येत आहे.

दरम्यान, चिंतेची बाबत म्हणजे म्युटेशन झाल्याने समोर आलेले कोरोना विषाणूचे नवे रूप हे मास्क आणि सोशल डिस्टंसिंगला सुद्धा निरुपयोगी बनवू शकते, अशी चिंता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अनुवांशिक अध्ययनानंतर अमेरिकेमधील टेक्सास येथील ह्युस्टनमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ९९.९ टक्के कोरोना रुग्ण हे या विषाणूचे नवे म्युटेशन असलेल्या D614G हे आ

कोरोना विषाणूचे नवे रूप असलेल्या D614G बाबत यापूर्वी देखील माहिती समोर आली होती. मात्र नव्या संसोधनामध्ये शास्त्रज्ञांनी नव्या म्युटेशनबाबत अतिरिक्त माहिती दिली आहे. बुधवारी हे संशोधन MedRXiv या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. नवे म्युटेशन अधिक संसर्गजन्य आणि आधीच्या विषाणूच्या तुलनेत अधिक जीवघेणे असल्याचे या संशोधनाच्या निष्कर्षात म्हटले आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणूने नव्या परिस्थितीतीशी जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तो सोशल डिस्टंसिंग, हँड वॉशिंग आणि मास्कलासुद्धा निष्प्रभ करू शकतो. अमेरिकेच्या नॅशनल इंस्टिट्युट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शन डिसीजमधील विषाणूतज्ज्ञ डेव्हिड मॉरिस यांनी सांगितले की, नवा विषाणू हा अधिक संसर्गजन्य् असू शकतो. ज्यामुळे कोरोनाला रोखण्याच्या प्रयत्नांवरसुद्धा परिणाम होऊ शकतो.

संशोधनात म्हटले आहे की,, कोरोनाचे एक नवे म्युटेशन स्पाइक प्रोटिनच्या संरचनेमध्ये बदल घडवून आणते. संशोधकांनी यादरम्यान, विषाणूच्या एकूण पाच हजार ८५ सिक्वेंसचा अभ्यास केला आहे. त्यामधून कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान मार्चमध्ये ७१ टक्के रुग्ण हे नव्या म्युटेशनमधील असल्याचे समोर आले. मात्र मे महिन्यात आलेल्या दुसऱ्या लाटेदरम्यान, नव्या म्युटेशनवाल्या रुग्णांची संख्या ९९.९ ट्क्के कमी झाली होती.

अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठ आणि टेक्सास विद्यापीठाच्या पथकाने केलेल्या या संशोधनादरम्यान नव्या म्युटेशनमुळे बाधित झालेल्या रुग्णांमध्ये व्हायरस लोड अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्याकारणामुळे असे लोक अधिक संसर्ग पसरवू शकतात.