शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : आनंदाची बातमी! प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 3:09 PM

1 / 14
देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 53,08,015 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 85,619 लोकांना जीव गमवावा लागला आहे.
2 / 14
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 93,337 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,247 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना अनेक दिलासादायक घटना समोर येत आहेत.
3 / 14
कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. याच दरम्यान कोरोनासंदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
4 / 14
प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अँटीबॉडी विकसित झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीमध्ये करण्यात आलेल्या सीरो सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे.
5 / 14
जवळपास 33 टक्के दिल्लीकरांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटीबॉडी विकसित झाल्या आहेत. सीरो सर्व्हेनुसार, दोन कोटी लोकसंख्या असलेल्या दिल्लीत 66 लाख जणांना कोरोनाची लागण झाली होती.
6 / 14
17 हजार नमुने घेण्यात आले होते. या सर्वेतील महत्त्वाचे मुद्दे पुढच्या आठवड्यात जाहीर केलं जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे अँटीबॉडी विकसित झाल्यामुळे बरे झालेल्या लोकांचा आकडा हा वाढू शकतो.
7 / 14
मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयात नमुन्यांचं विश्लेषण करण्यात येत आहे. याच महाविद्यालयाकडून याआधी करण्यात आलेले दोन सीरो सर्व्हे देखील तेथेच करण्यात आले होते.
8 / 14
पहिल्या सीरो सर्व्हेमध्ये 23 टक्के तर दुसऱ्या सीरो सर्व्हेमध्ये 29 टक्के लोकांमध्ये कोरोना अँटीबॉडी आढळून आली होती. दिल्ली सरकारने दर महिन्याच्या सुरुवातीला सीरो सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे
9 / 14
दिल्लीत कोरोना व्हायरसची स्थिती नेमकी कशी आहे हे समजणं हा या मागचा उद्देश असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्लीतील रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे.
10 / 14
वयोगटानुसार नमुने जमा करण्यात आले होते. 18-49 या वयोगटात सर्वाधिक नमुने जमा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
11 / 14
जगभरातील अनेक वैज्ञानिक आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी या कंपन्या चाचणीत पूर्ण पारदर्शकता ठेवत नसल्याच म्हटलं आहे. विशेषतः जेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव लशीची चाचणी थांबते तेव्हा कंपनी याबाबत माहिती देण्यास नकार देतात.
12 / 14
अ‍ॅस्ट्रॉजेनेका (AstraZeneca) ही लस याचं उदाहरण आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या या लशीची चाचणी थांबवण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे.
13 / 14
कंपनीने रुग्णांच्या स्थितीबद्दल किंवा लसीची चाचणी थांबवण्यामागचे कारण सांगितले नाही. तसेच पॅनेलचा रिपोर्टही समोर आला नाही. कंपनी लसीबाबत फारच कमी माहिती देत आहेत.
14 / 14
तज्ज्ञांच्या मते, कंपन्यांनी केलेले विधान हे संशोधनाविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्याचे आश्वासन देत नाही. अमेरिकेतील तीन कंपन्या- अ‍ॅस्ट्रॉजेनेका, मॉडर्ना आणि फायझर अखेरच्या टप्प्यात आहेत. या तिघांनी चाचण्यांचे प्रोटोकॉल आणि विश्लेषण प्लॅन पुढे आणला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीIndiaभारत