शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVaccine: किंमत-परिणामांपासून ते साईड इफेक्ट्सपर्यंत; जाणून घ्या, लशीशी संबंधित 'या' 21 प्रश्नांची उत्तरं

By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 04, 2021 3:35 PM

1 / 24
नव्या वर्षाला सुरुवात होताच देशाला आनंदाची बादमी मिळाली. ज्या कोरोना व्हायरसने 2020मध्ये संपूर्ण जगात हाहाकार घातला, आता त्याचा शेवट आला आहे. या बाबतीत भारतही आता इंग्लंड आणि अमेरिकेच्या ओळीत जाऊन बसला आहे. आता भारताच्याही पहिल्या स्वदेशी लशीला परवानगी मिळाली आहे. याच बरोबर भारताच्या सीरम इंस्ट्यूटच्या पुढाकाराने तयार झालेल्या कोविशील्डलाही आपतकालिक वापराची परवानगी मिळाली आहे. आता, 2021च्या या आनंदाच्या बातमीबरोबरच उभे राहताहेत हे 21 प्रश्न, जे आपल्यालाही नक्कीच पडले असतील...!
2 / 24
कोरोनाविरोधातील 'कोविशील्ड' आणि 'कोव्हॅक्सीन' कुणाला मिळणार? कशी मिळणार? केव्हा मिळणार? तिची किंमत किती असेल? लशीपासून काही धोका तर नाही? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, ही लस आपल्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत केव्हा, कशी आणि किती किंमतीत पोहोचेल? जाणून घ्या...
3 / 24
प्रश्न-1. कोरोनावरील या दोन्ही लशी कितपत प्रभावी आहेत? उत्तर- 70 टक्क्यांहून अधिक प्रभावी
4 / 24
प्रश्न -2. व्हॅक्सीनचे काही साईड इफेक्ट्स आहेत का? उत्तर- नाही, आतापर्यंत उंदरापासून ते माकड आणि चिंपाजी आणि मानवावर केलेल्या ट्रायलमध्ये कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट दिसून आलेला नाही.
5 / 24
प्रश्न -3. लशीचा परिणाम किती दिवसांपर्यंत राहतो? उत्तर- स्पष्ट नाही, कंपन्यांनी यासंदर्भात वेगवेगळे दावे केले आहेत.
6 / 24
प्रश्न -4. लशीचे किती डोस आवश्यक? उत्तर- 2 डोसपासून ते 3 डोसपर्यंत
7 / 24
प्रश्न -5. दोन लशीत किती दिवसांचे अंतर? उत्तर- दोन आठवड्यांपासून ते दोन महिन्यांपर्यंत
8 / 24
प्रश्न -6. या अंतरादरम्यान कोरोनाची लागण होऊ शकते का? उत्तर- हो, संपूर्ण इम्यूनिटी डोस पूर्ण झाल्यावरच. नुकताच, हरियाणाच्या आरोग्यमंत्र्यांना लशीच्या चाचणीतील पहिला डोस देण्यात आला, मात्र, दुसरा डोस देण्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली होती.
9 / 24
प्रश्न -7. लशीची किंमत काय असेल? उत्तर- कोव्हॅक्सीन - 100/डोस कोविशील्ड - 1000/डोस
10 / 24
प्रश्न -8. लस मोफत मिळणार का? उत्तर- डॉक्टरांसह 3 कोटी फ्रंटलाईन वर्कर्सना मोफत मिळणार. सर्वसामान्यांबाबत अद्याप स्पष्टता नाही.
11 / 24
प्रश्न -9. सुरुवातीला किती लोकांना टोचली जाणार सल? उत्तर- 3 कोटी फ्रंट लाईन वर्कर्स 27 कोटी वृद्ध आणि आजारी लोक
12 / 24
प्रश्न -10. लसीकरणादरम्यान मुलांचे काय? उत्तर- मुलांसाठी लस नाही. ट्रायल केवळ16 वर्षांच्या वरील लोकांवरच.
13 / 24
प्रश्न -11. गर्भवती महिलाना लस देणे शक्य आहे का? उत्तर- यासंदर्भात कंपन्यांनी अद्याप कुठल्याही प्रकारचा दावा केलेला नाही.
14 / 24
प्रश्न -12. ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांना केव्हा मिळणार लस? उत्तर - ज्यांना काही गंभीर आजार आहे, त्यांना लवकरात लवकर लस मिळेल. जुन्या, मात्र स्वस्थ संक्रमितांना सर्वात शेवटी लस.
15 / 24
प्रश्न -13. देसी आणि विदेशी लशीत काही फरक आहे? उत्तर- तंत्राचा फरक, पण सारख्याच असल्याचा दावा.
16 / 24
प्रश्न -14. लस घेतल्यानंतर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे? उत्तर- मास्क, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टंसिंग सुरूच राहणार.
17 / 24
प्रश्न -15. नव्या स्ट्रेनवर लस कितपत प्रभावी? उत्तर- मॉडर्नाचा दावा - पूर्णपणे प्रभावी मॉडर्नाचे निवेदन - आतापर्यंत उपस्थित माहितीच्या आधारे, मॉडर्नाची लस नव्या स्ट्रेनवर पूर्णपणे प्रभावी आहे. तसेच आम्ही आणखी माहिती मिळवत आहोत.
18 / 24
प्रश्न -16. खाण्या पिण्यासंदर्भात खबरदारी घेणे आवश्यक आहे? उत्तर- दारू वगळता कुठल्याही प्रकारचे बंधन नाही. स्पूतनिक 5 - लस घेण्याच्या दोन आठवडे आधीपासून, लस घेतल्यानंतर 42 दिवस दारू टाळणे. इतर कंपन्यांचा दावा - दारू पिल्याने इम्युनिटी कमी होते. यामुळे दारू टाळावी.
19 / 24
प्रश्न 17. भारतातील लसिकरणाची तयार कशी? उत्तर- तयारी पूर्ण, ड्राय रन सुरू
20 / 24
प्रश्न -18. भारतात संपूर्ण लसीकरणासाठी किती वेळ लागणार? उत्तर- लसीकरण सुरू झाल्यानंतर 2 ते 3 वर्ष
21 / 24
प्रश्न -19. लसीकरण सुरू झाल्यानंतर संक्रमण कमी होईल? उत्तर- जेवढ्या लोकांचे लसीकरण तेवढे कोरोनाबाधित कमी आढळतील.
22 / 24
प्रश्न - 20. दरवर्षी घ्यावी लागेल लस? उत्तर- इम्यूनिटीचा डेटा आल्यानंतरच स्पष्ट होईल
23 / 24
प्रश्न - 21. कोरोना लसीमुळे नपुंसकत्व येऊ शकते? उत्तर- बिल्कुल नाही, पूर्णपणे निराधार
24 / 24
आशा आहे, की 2021च्या या 21 प्रश्नांमध्ये आपलाही प्रश्न असेल आणि आपल्याला त्या प्रश्नाचे उत्तरही मिळाले असेल.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस