Coronavirus: कोरोनामुळं नुकसान झाल्याचं Blood Test मधून कसं कळतं? डॉक्टरांनी सांगितले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 07:05 PM2021-05-05T19:05:26+5:302021-05-05T19:10:28+5:30

Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यात आरटीपीसीआर आणि अँन्टीजेन चाचणीसोबत अन्य चाचण्याही डॉक्टरांकडून केल्या जात आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह लक्षणं समोर आल्यानंतर पहिल्यांदा चाचणी करणं गरजेचे असल्याचं सांगितलं जातं. परंतु लोक आरटीपीसीआर आणि अँन्टीजेच चाचणीसह अन्य आणखी काही चाचण्या करत आहेत.

सीटीस्कॅनसह ब्लड टेस्टही त्यात समावेश आहे. तुम्हाला माहित्येय का? अखेर ब्लड टेस्टमधून शरीरात असणारं कोरोना संक्रमण कसं ओळखायचं? आणि ब्लड टेस्ट कधी करायला हवी? याचे काही साइड इफेक्ट आहेत की काही उपयोगाची आहे जाणून घेऊया.

देशभरात कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच जास्तीत जास्त रुग्ण होम आयसोलेशन बरे होत आहेत. रुग्ण घरी राहून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत. तर काही जण एकमेकांशी बोलून टेस्ट करण्याचा निर्णय घेत आहेत. परंतु तुम्हाला माहिती हवं की, सीटीस्कॅन किंवा ब्लड टेस्ट केल्याने काही फायदा होणार की नाही याबाबत तुम्हाला माहिती हवी.

एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया वारंवार लोकांना सल्ला देत आहेत की, जर कोणतंही लक्षण नसेल किंवा सौम्य लक्षण असेल तर तुम्हाला टेस्ट करण्याची गरज नाही. तरुणांमध्येही जास्त लक्षण नसतील तर टेस्ट करण्याची गरज नाही. ब्लड टेस्ट विशेषत: वृद्ध आणि पहिला आजार असलेल्यांनी करावा

कोरोना लक्षणं असतील तर ते ब्लडमधील सीबीसीच्या तपासात प्लेटलेट्स आणि डब्ल्यूबीसीमधून कळतं. या रिपोर्टमुळे तुमच्या शरीरात किती प्रमाणात व्हायरसनं नुकसान पोहचवलं आहे हे कळतं.

त्याशिवाय केएफटी आणि एएफटी सारख्या चाचणी कराव्यात. ज्यात लिवर आणि किडनी फंक्शनची माहिती मिळते. त्याशिवाय लोक ब्लड शुगर, सीरम क्रेटेटिन इ. टेस्टदेखील केल्या जातात. जे एकप्रकारे रुटीन ब्लड टेस्ट आहे.

डॉक्टर सांगतात की, ब्लडच्या माध्यमातून आयएल ६ ची चाचणी कधी कधी करायला लागते. परंतु हे त्या रुग्णांसाठी आहे ज्यांच्या शरीरात कोरोना व्हायरस गंभीरपणे पसरला आहे. या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावं लागतं.

ही चाचणी कधीही सौम्य लक्षणं किंवा घरात ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशा रुग्णांसाठी नाही. CRP म्हणजे सी रिएक्टिव प्रोटीन टेस्टच्या माध्यमातून एक्यूट इन्फ्लमेशन समजतं. यात सीआरपीचं फुस्फुसाची स्थिती आणि गंभीर आजाराची माहिती मिळते.

D Dimer या टेस्टने ब्लड क्लॉटचीं स्थिती कळते. त्याचसोबत Chest CT या टेस्टच्या माध्यमातून निमोनियाची आधीच माहिती मिळते.

तर सीटीस्कॅनबाबत डॉक्टरांचा सल्ला आहे की, कोरोनाची सौम्य लक्षणं असतील ही चाचणी करू नका. डॉ. अश्विनी मल्होत्रा फिजिशियन सांगतात की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सीटी स्कॅन करू नका. किंवा कोणतंही लक्षण दिसत नसेल तरी चाचणी करू नका. कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीही ही चाचणी करू नये. ही शरीरासाठी हानिकारक असते.