शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus : समोर आली कोरोनाची ६ नवी लक्षणं, त्यांच्याकडे करू नका दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 4:42 PM

1 / 10
कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसवर लस आणि औषध शोधण्यासाठी सगळ्याच देशातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचा प्रसार जसजसा वाढत चालला आहे तसंतसं नवीन गोष्टी समोर यायला सुरूवात झाली आहे. आजवर जगभरात दोन लाखांपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
2 / 10
आत्तापर्यंत कोरोनाची सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं तुम्हाला माहीत असतील. अलिकडे कोरोनाची नवीनच लक्षणं दिसायला सुरुवात झाली आहे. एक दोन नाही तर सहा प्रकारची लक्षणं आहेत. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रीवेंशनने या लक्षणांबद्दल सांगितले आहे.
3 / 10
पहिलं लक्षण : कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेल्या रुग्णाला जास्त थंडी वाजते. अनेकांना थंडी वाजण्यासोबत शरीर थरथरल्यासारखं होतं. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या या नवीन लक्षणात रुग्णाला थंडी जास्त प्रमाणात वाजते.
4 / 10
दुसरं लक्षण : कोरोना व्हायरसंच दुसरं लक्षण सुद्धा थंडी तापाप्रमाणेच असतं. यात रुग्णाचे शरीर थंडीने कापायला सुरूवात होते. ज्यांना ही लक्षण दिसत असतील त्यांनी मलेरिया किंवा ताप समजून दुर्लक्ष करू नये. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तज्ञांशी संपर्क करावा.
5 / 10
तिसरं लक्षण : कोरोना व्हायरसच्या या लक्षणात शरीराला वेदना होतात. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे मांसपेशींमध्ये वेदना होतात. शरीराच्या कोणत्याही अवयवांना काम करत असताना जखम होण्याची शक्यता असते. अंगदुखीची समस्या तीव्रतेने जाणवते. अशी लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर जवळच्या दवाखान्यत जाऊन तपासणी करून घ्या आणि स्वतःला क्वारंटाईन ठेवण्याचा प्रयत्न करा
6 / 10
चौथं लक्षण : कोरोना व्हायरसच्या लक्षणांमध्ये डोकेदुखीची समस्या प्रकर्षाने जाणवते. साधारण डोकेदुखी आणि कोरोनाच्या संक्रमणामुळे होत असलेली डोकेदुखी यातला फरक रुग्णाला जाणवत असतो. याशिवाय सर्दी, खोकल्याच्या समस्या जाणवत असतात. जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळया प्रकारे आणि जास्त तीव्रतेने डोकेदुखीचा त्रास होत असेल डॉक्टरांना माहिती देऊन चाचणी करून घ्या.
7 / 10
पाचवं लक्षणं : सीडीसीद्वारे देण्यात आलेल्या लक्षणांमध्ये घसा दुखण्याचा सुद्धा समावेश होता. घश्यात होत असलेल्या वेदनांचे कारण थंड पदार्थ खाणं, झोपण्याची चुकीची पध्दत हे सुद्धा असू शकतं. हे दुखणं दोन दिवसात बरं होणारं असतं. पण गरम पाणी पिऊन इतर अनेक उपाय करून सुद्धा तुम्हाला फरक पडला नाही. तर कोरोनाच्या संक्रमणाचं लक्षण असू शकतं. घश्यात तीव्र वेदना होत असतील घास गिळायला त्रास होत असेल तर त्वरित जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
8 / 10
सहावं लक्षणं : कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा वास येत नाही. नाकाला संवेदना जाणवत नाहीत. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन द्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णाला वास, गंध समजत नाही. तुम्हाला सुद्धा असा त्रास उद्भवत असेल तर उशीर करता तपासणीसाठी जा.
9 / 10
कोरोना व्हायरसचं संक्रमण झपाट्याने पसरत असताना वैयक्तीक स्वच्छता, सोशल डिस्टेंसिंग गोष्टींकडे लक्ष देणं सुद्घा तितकंच महत्वाचं आहे. म्हणून कोणतंही लक्षण दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण तुमच्यामुळे तुमच्या कुटुंबाला सुद्धा कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. म्हणून वेळीच सावधगिरी बाळगा.
10 / 10
कोरोना व्हायरसचं संक्रमण झपाट्याने पसरत असताना वैयक्तीक स्वच्छता, सोशल डिस्टेंसिंग गोष्टींकडे लक्ष देणं सुद्घा तितकंच महत्वाचं आहे. म्हणून कोणतंही लक्षण दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण तुमच्यामुळे तुमच्या कुटुंबाला सुद्धा कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. म्हणून वेळीच सावधगिरी बाळगा.
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या