Corona Virus : बापरे! कोरोनाने उडवली झोप, वाढला विसरभोळेपणा; रुग्ण करताहेत 'या' समस्यांचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 06:48 PM2022-09-20T18:48:15+5:302022-09-20T19:14:50+5:30

Corona Virus : कोरोनानंतर फक्त भारतातच नव्हे तर जगभरात अल्झायमर (स्मृतीभ्रंश) आणि इन्सोमनिया (निद्रानाश) च्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

तुम्ही नीट झोप न लागण्याच्या समस्येचा सामना करत आहात का? रात्री उशीरा झोपतो किंवा झोपल्यानंतर लवकर उठतो. जर अशी समस्या असेल तर आपण शक्य तितक्या लवकर डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये अशा समस्या खूप वेगाने दिसून येत आहेत.

एम्सच्या न्यूरो विभागातील अतिरिक्त प्राध्यापक डॉ. मंजरी त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनानंतर फक्त भारतातच नव्हे तर जगभरात अल्झायमर (स्मृतीभ्रंश) आणि इन्सोमनिया (निद्रानाश) च्या रुग्णांची संख्या वाढली आहे. कोविडनंतर, या आजाराची सर्वात मोठी समस्या ही आहे की लोकांना हे माहीत नाही की ते अशा गंभीर आजाराचे शिकार झाले आहेत.

डॉ.मंजरी त्रिपाठी म्हणाल्या की, अल्झायमर आजाराचे निदान आणि उपचार गेल्या दोन वर्षांत नीट होऊ शकले नाहीत. कोविड-19 नंतर हा आजार मोठ्या प्रमाणात वाढला, कारण रुग्ण दोन वर्षे उपचारापासून वंचित होते आणि त्याच दरम्यान नवीन रुग्ण आले, नवीन परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे त्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

डॉक्टर मंजरी यांनी सांगितले की, सर्वात मोठी समस्या ही आहे की रुग्ण त्याला अल्झायमर आहे हे मान्य करण्यास तयार नाही. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना असे वाटते की ते विसरण्याच्या समस्येने खूप त्रासलेले आहेत. ही वयाची तक्रार आहे, असे त्यालाही वाटते, पण प्रत्यक्षात ते अल्झायमर या आजाराचा बळी ठरले आहेत.

खरं तर हा आजार लोकांना अजून नीट समजलेला नाही. आजकाल, अल्झायमर नावाच्या आजाराबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, ज्यामुळे मेंदू आणि स्मरणशक्ती खराब होते. या आजाराने ग्रस्त व्यक्ती हे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनाही विसरते अशी माहिती देखील दिली आहे.

डॉ. मंजरी त्रिपाठी यांनी सांगितले की, कोविड नंतरच्या लक्षणांमध्ये लोकांना ब्रेन फॉग, काम करणे लक्षात ठेवण्याच्या समस्या येत आहेत. याला डिमेंशिया ब्रेनफॉग म्हणता येईल. कोविडनंतरच्या रुग्णांमध्ये थकवा आणि काम न करण्याची समस्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासोबतच स्मरणशक्तीबाबतही त्रास होतो.

कोरोना व्हायरस येण्याआधी 50 किंवा 70 वर्षांचे लोकही खूप धावायचे, खूप फिरायचे, पण गेल्या 2 वर्षात सर्व काही थांबले आहे. त्याच्यामुळेच ही समस्या उद्भवली आहे. ही समस्या जगभर पसरली आहे. कोविड नंतर कोविड, दीर्घ कोविड ही संपूर्ण जगासाठी समस्या बनली आहे.

डॉ. त्रिपानी यांनी व्यक्ती आपलं किरकोळ, रोजचं काम देखील विसरायला लागतात. त्यांच्या बोलण्याच्या भाषेवरही हळूहळू परिणाम होऊ लागतो. वेळ आणि ठिकाण सांगता येत नाही. त्याच्या विचारांवरही परिणाम होतो. विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्तीही संपते असं म्हटलं आहे,

गोष्टी लक्षात ठेवणे आणि विसरणे... यामुळे पुढे लोकांशी संपर्क कमी होऊ लागतो आणि रुग्ण एकांतात राहू लागतो. त्याची पूर्वीप्रमाणे काम करण्याची क्षमताही संपते असं सांगितलं. डॉक्टर मंजरी यांनी सांगितले की, सहसा झोप न येण्याच्या आजाराला निद्रानाश म्हणतात. कोविडनंतर असे आढळून आले आहे की लोकांना झोपेत भयानक स्वप्न पडत आहेत.

काही लोक घाबरून उठतात. तांत्रिक भाषेत आपण त्याला निद्रानाश म्हणतो. अशा परिस्थितीत लोक खूप लवकर औषधे घेणे सुरू करतात. यामध्ये ताबडतोब औषधे न घेणे अधिक महत्त्वाचे आहे. यावर डॉक्टरांचा तातडीने योग्य सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.