Corona Vaccine: कोरोनाच्या ‘Delta Variant’ पासून वाचण्यासाठी कोणती लस किती टक्के प्रभावी? नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 10:09 PM2021-06-15T22:09:02+5:302021-06-15T22:11:53+5:30

Corona Vaccination: संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसच्या डेल्टा वेरिंएटमुळे चिंतेत आहे. इंग्लंडमध्ये २१ जूनऐवजी आता १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

भारतात आलेली दुसरी लाट ही डेल्टा वेरिएंटमुळे धोकादायक बनली आहे. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लोक लसीकरण करत आहेत. लस उत्पादक कंपन्यांनी दावा केलाय की, त्यांची लस कोरोनाच्या अनेक वेरिंएटपासून वाचवू शकते. परंतु किती? इंग्लंडमध्ये झालेल्या एका रिपोर्टमधून समोर आलंय की, डेल्टा वेरिएंटपासून २ प्रमुख लस किती प्रमाणात वाचवू शकतात? जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये काय म्हटलंय.

कोरोना लस घेतलेले लोक कोविड १९ च्या संक्रमणापासून ९० टक्के वाचू शकतात. याचा अर्थ असा की, १० टक्के लोक असे आहेत जे लस घेतल्यानंतरही कोरोना संक्रमित होऊ शकतात. तेदेखील कोरोनाच्या अन्य वेरिएंटमुळे. परंतु डेल्टा वेरिएंटपासून कोणती लस वाचवेल?

डेल्टा वेरिएंट(Delta Variant) सर्वात आधी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात भारतात आला होता. आताच्या घडीला इंग्लंडमध्ये जितके रुग्ण आहेत त्यातील ९० टक्के रुग्ण डेल्टा वेरिएंटने संक्रमित आहेत. त्यामुळे यूके सरकारची डोकेदुखी वाढली आहे. अद्याप डेल्टा वेरिएंटवर कोणतीही लस निर्माण झाली नाही. जगभरात जितक्या लस तयार झाल्यात त्या अल्फा वेरिएंटच्या प्रभावानुसार बनवल्या आहेत.

सर्वसामान्यपणे कोरोनावर बनलेली लस ही कोविड १९ मुळे होणाऱ्या गंभीर समस्या आणि मृत्यूपासून लोकांना वाचवते. परंतु नव्या वेरिएंटवर लसीचा कमी परिणाम दिसून येतो. नवा वेरिएंट म्यूटेट स्वत:मध्ये बदल करत आहे. असंही नाही की, लस पूर्णपणे परिणामकारक ठरत नाही पण कोरोनाच्या नव्या वेरिएंटसोबत लढण्याची क्षमता थोडी कमी करतं.

पब्लिक हेल्थ स्कॉटलँडने जमा केलेल्या डेटानुसार ज्या लोकांनी कोविड १९ पासून वाचण्यासाठी फायझर बायोएनटेक(Pfizer Biotech Vaccine) लस घेतली आहे. त्यांना कोरोनाच्या अल्फा वेरिएंटपासून ९२ टक्के संरक्षण मिळत आहे. त्याचसोबत नव्या डेल्टा वेरिएंट आल्यानंतर फायझर लस घेतलेल्या ७९ टक्के संरक्षण मिळत आहे.

दुसरीकडे ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका(Oxford AstraZeneca Vaccine) लस घेणाऱ्या लोकांमध्ये अल्फा वेरिएंटपासून ७३ टक्के संरक्षण मिळतंय तर डेल्टा वेरिएंटच्या तुलनेत ६० टक्के संरक्षण मिळत आहे. ज्या लोकांनी फायझरचा पहिला डोस घेतला त्यांना अल्फा वेरिएंटपासून ५१ टक्के तर डेल्टा वेरिएंटमुळे ३३.५ टक्के संरक्षण मिळतं परंतु आता वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानंतर धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

फायझर बायोएनटेक लस(Pfizer BioNtech Vaccine) चे दोन्ही डोस घेणाऱ्या लोकांमधील शरीरामध्ये अल्फा वेरिएंटपासून वाचण्याचे ९३.४ टक्के परिणाम आहेत. डेल्टा वेरिएंटपासून ८८ टक्के संरक्षण मिळते. तर ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांमध्ये अल्फा वेरिएंटमुळे ६६ टक्के तर डेल्टा वेरिएंटपासून ६० टक्के संरक्षण मिळते.

ऑक्सफोर्डच्या लसीचे परिणाम कमी दिसतायेत कारण यामागे अनेक कारणं आहेत. कोणतीही लस वेगवेगळ्या वेरिएंट्सवर काम करत नाही. डेल्टा वेरिएंटवर ऑक्सफोर्डची लस कमी प्रभावशाली आहे याचा अर्थ ती इतर वेरिएंट्सवर कमी प्रभावी असेल असा होत नाही. वैज्ञानिकांनी काढलेल्या निष्कर्षानुसार डेल्टा वेरिएंटविरोधात फायझर लस ८८ टक्के तर ऑक्सफोर्ड लस ६७ टक्के प्रभावी ठरते.

जर तुम्ही फायझर अथवा ऑक्सफोर्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असतील आणि तुम्हाला डेल्टा वेरिएंटचं संक्रमण झालं तरी घाबरू नका. कारण जेव्हा गांभीर्याची गोष्ट येते तेव्हा दोन्ही लसी रुग्णाला गंभीर अवस्थेत जाण्यापासून रोखतात. म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापासून वाचवू शकतात असं तज्त्र सांगतात

फायझर बायोएनटेक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर डेल्टा वेरिएंटचं संक्रमण झाल्यास हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची शक्यता ९४ टक्के कमी होते. दोन्ही डोस घेतल्यानंतर ९६ टक्के कमी होते. ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेकाची लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ७१ टक्के तर दुसऱ्या डोसनंतर ९२ टक्के हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची शक्यता कमी असते.