Corona Side effects: नवे संकट! कोरोनातून बरे झाल्यावर रुग्णांचा आवाज गायब होतोय; डॉक्टर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 01:55 PM2021-09-27T13:55:35+5:302021-09-27T13:58:52+5:30

Post covid side effects: कोरोना रुग्णांना बरे झाल्यावर त्यांचा आवाज गायब होण्याच्या समस्येने ग्रासले आहे. आधीच अशक्तपणा, म्युकर मायकोसिस सारख्या आजारांना तोंड देताना नवीनच समस्या उभी ठाकली आहे.

कोरोना पश्चात विविध आजारांची चिंता असताना आता आणखी एक नवे संकट समोर आले आहे. कोरोना रुग्णांना बरे झाल्यावर त्यांचा आवाज गायब होण्याच्या समस्येने ग्रासले आहे. आधीच अशक्तपणा, म्युकर मायकोसिस सारख्या आजारांना तोंड देताना नवीनच समस्या उभी ठाकली आहे. (Corona Surviors now dealing with lost voice for two weeks to three months)

पश्चिम बंगाल (West Bengal) ची राजधानी कोलकाता (Kolkata) मध्ये अशा प्रकारचे साईड इफेक्ट आढळून आले आहेत. काही काळासाठी त्यांचा आवाज जात आहे. (Post Corona Side effects, voice loss.)

डॉक्टरांनी यावर सांगितले की, अधिक चिंता करण्याचे कारण नाही. आवाज जाण्याचा हा बदल काही काळापुरता आहे. रुग्णांनी एकदम धक्क्यात जाऊ नये.

CMRI हॉस्पिटलचे पल्मोनोलॉजीचे संचालक राजा धर यांनी यावर काळजी करण्यासारखे नसल्याचे म्हटले आहे. काही काळासाठी आवाज जाण्यामुळे त्याचे दूरगामी परिणाम जाणवणार नाहीत. काही दिवसांतच आवाज परत येईल.

तज्ज्ञांनुसार फुफ्फुसांमधील फायब्रोसिस किंवा काही आठवड्यांपर्यंत आवाज न फुटल्यामुळे आवाजात समस्या होऊ शकते. याचे थेट कारण कोरोनाची लागण नाहीय. रुग्ण आधीपासूनच घशाच्या इन्फेक्शनमुळे त्रस्त असेल ज्यामुळे त्याचा घसा बसला असेल.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आरएन टागोर इंटरनेशनल इंस्टीट्यूटचे संशोधक सौरेन पांजा यांनी सांगितले की, लोवर रेस्पिरेटरी सिस्टिमसोबत कोरोनाच्या काही रुग्णांना अप्पर रेस्पिरेटरी सिस्टिमलाही धक्का बसला आहे. सोबतच गळ्याच्या इन्फेक्शनमुळे सूज येण्याची शक्यता आहे. यामुळे काही काळासाठी आवाज जाऊ शकतो.

कोरोना संक्रमण झाल्यानंतर पहिला ते तिसरा आठवड्यापासून तीन महिन्यांपर्यंत आवाज जाऊ शकतो. परंतू पूर्णपणे कोणाचा आवाज जाणार नाही. मात्र, जे लोक हे अनुभवतील ते डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे.

Read in English