1 / 9कोरोनापासून बचावासाठी हेल्थ एक्सपर्ट्सनी रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेल्या गोष्टींवर अधिक भर दिला आहे. आयुष मंत्रायलने कोरोनापासून बचावासाठी काही उपाय लोकांना दिले आहे. या उपायांना आयुर्वेदात खूप प्रभावी मानलं जातं. 2 / 9आयुष मंत्रालयानं सगळ्यांनाच गरम पाणी पिण्याचा सल्ला दिली आहे. दिवसभरातून जास्तीत जास्तवेळा गरम पाणी पिण्याचा प्रयत्न करायला हवा. याव्यतिरिक्त गरम पाण्यात चुटकीभर मीठ आणि हळद घालून तुम्ही गुळण्या करू शकता.3 / 9घरी तयार केलेलं जेवण खाण्याचा प्रयत्न करा. कारण असं जेवण पचायला हलकं असेल. खाण्यात हळद, जीरं, धणे, आलं, लसूण यांसारख्या मसाल्यांचा वापर करा. याशिवाय तुम्ही आवळ्याचा समावेशही आहारात करू शकता. 4 / 9आयुश नॅशनल क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल्सनुसार कमीत कमी ३० मिनिटं योगा किंवा प्राणायम करायला हवं. याव्यतिरिक्त चांगली झोप घ्या. दिवसा न झोपता रात्री स ७ ते ८ तासांची झोप घ्या.5 / 9इम्यूनिटी वाढवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी २० ग्राम व्यवनप्राश रिकाम्या पोटी घ्या. हळद घातलेल्या दुधाचे सेवन करा. याव्यतिरिक्त गुडूची घनवटी ५०० मिलिग्राम, अश्वगंधा गोळी ५०० मिलिग्राम दिवसातून दोनवेळा गरम पाण्यासोबत खायला हवी. 6 / 9तुळस, दालचीनी, आलं, काळी मिरीपासून तयार केलेली हर्बल टी किंवा काढ्याचे सेवन करायला हवे. ही सर्व साम्रगी१५० एमएल गरम पाण्यात घालून उकळून घ्या त्यानंतर १५० मिली पाण्यात घालून उकळून घ्या. त्यानंतर हे पदार्थ गाळून एकदा किंवा दोनदा सेवन करा. तुम्ही चवीनुसार गुळ, मनुके, वेलची घालू शकता. 7 / 9सकाळ संध्याकाळ नाकात तिळाचे तेल किंवा नारळाचे तेल, याव्यतिरिक्त गाईचे तूप घालावे. दिवसातून एक ते दोनवेळा ऑईल पूलिंग थेरेपी करा. 8 / 9पुदीन्याची पानं, ओवा आणि कापूर घालून वाफ घ्या. दिवसातून एकदा नक्कीच वाफ घेणं फायद्याचं ठरेल. लक्षात ठेवा जास्त गरम पाण्यानं वाफ घेऊ नका, कारण यामुळे त्वचेला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 9 / 9 लवंग, साखर, मध एकत्र करून दिवसातून दोन ते तीनवेळा घेतल्यानं खोकला आणि कफपासून आराम मिळेल.