शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

China Coronavirus : 'कोरोना'बाबतच्या 'या' गोष्टी पालकांना माहीत असायलाच हव्यात, अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 12:31 PM

1 / 12
चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. जगभरात आतापर्यंत 2800 लोकांचा मृत्यू झाला असून 83 हजार लोकांना संसर्ग झाला आहे.
2 / 12
चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 48 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.
3 / 12
कोरोना व्हायरसने आता जगालाच आपल्या कवेत घेण्यास प्रारंभ केल्याने जगभरामध्ये भीतीचे वातावरण आहे. या भीतीने आशियातील सर्वच शेअर बाजारांमध्ये तीव्र घसरण झाली. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाही धक्का बसण्याची शक्यता आहे.
4 / 12
कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असून, 40 हून अधिक देशांनी हाय अलर्ट घोषित केला आहे. चीननंतर दक्षिण कोरिया आणि इराणमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे.
5 / 12
लहान मुलांना कोरोनाची लगेच लागण होते. या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या याबाबत UNICEF च्या आरोग्य तज्ञांनी माहिती दिली आहे. त्याबाबत जाणून घेऊया.
6 / 12
कोरोना व्हायरस झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर या व्हायरसची लागण होते. त्यामुळे पालकांनी मुलांना कोरोना झालेल्या व्यक्तींपासून अथवा ज्यांना खूप खोकला आहे, सर्दी आहे अथवा ताप आहे त्यांच्यापासून कमीतकमी 3 फूट अंतर ठेवावे असा सल्ला द्यावा.
7 / 12
सर्दी खोकला आणि अचानक ताप येणे यातून निमोनिया होणे हे या रोगाचे लक्षण आहे. त्यामुळे अशा प्रकारची लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. कोरोना व्हायरसच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने ताप, खोकला, सर्दी यांचा समावेश आहे.
8 / 12
कोरोनाची लागण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून साबण आणि पाणी किंवा सॅनिटायझरचा वापर करून कमीतकमी 20 सेकंदांपर्यंत आपले हात धुवावेत. खोकताना अथवा शिंकताना आपल्या तोंडावर हात ठेवावा.
9 / 12
मास्कचा वापर केल्यास कोरोना व्हायरसपासून सुटका होते असं काही नाही. मास्क घालण्यासोबतच हात स्वच्छ धुणे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर एखाद्या व्यक्तीला खोकला किंवा शिंका येत असेल तर त्यापासून बचाव करण्यासाठी मास्क घालणे हा उत्तम पर्याय आहे.
10 / 12
गर्भवती महिलेकडून तिच्या बाळाला देखील कोरोना व्हायरसची लागण होते. आईकडून व्हायरस बाळाला संक्रमित झाला आहे. मात्र त्याचा बाळावर नेमका काय परिणाम होऊ शकतो याचा पुरावा मिळालेला नाही.
11 / 12
चीनमध्ये एका गर्भवती महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे गर्भातच बाळाला कोरोनाचा संसर्ग झाला. मात्र अवघ्या 17 दिवसांच्या बाळाने कोरोनावर मात केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे कोणतेही उपचार न घेता या बाळाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
12 / 12
कोरोना व्हायरस बरा करण्यासाठी अद्याप कोणतेही विशिष्ट औषध आलेले नाही. स्वच्छता पाळणं हाच यावर एक उत्तम उपाय सांगितला जातो. त्यामुळे काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
टॅग्स :corona virusकोरोनाHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य