रिकाम्या पोटी हिंगाचं पाणी प्यायल्याने मिळतात इतके फायदे, जे तुम्हालाही माहीत नसतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 02:32 PM2024-06-11T14:32:39+5:302024-06-11T15:13:30+5:30

Asafoetida water : पावसाळ्यात अनेक आजार बॅक्टेरियामुळेच होतात. अशात हिंगाचं सेवन करून तुम्ही या आजारांचा धोका कमी करू शकता.

आयुर्वेदात हिंगाला फार महत्व आहे. कारण हींग केवळ वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरला जाणारा मसालाच नाही तर एक औषधी आहे. हिंगाचं सेवन करून तुम्ही अनेक समस्या दूर करू शकता. एक्सपर्टनुसार, हिंगात बॅक्टेरिया मारण्याची क्षमता असते. पावसाळ्यात अनेक आजार बॅक्टेरियामुळेच होतात. अशात हिंगाचं सेवन करून तुम्ही या आजारांचा धोका कमी करू शकता. तुम्ही जर हिंगाचं पाणी रिकाम्या पोटी प्याल तर अनेक समस्या दूर होतील.

पावसाळ्यात वातावरण बदलामुळे किंवा पाण्यामुळे त्वचेसंबंधी अनेक समस्या होण्याचा धोका असतो. खाज, खरूज, पुरळ अशा अनेक समस्या पावसाळ्यात होतात. अशात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये हींग टाकल्यास तुम्हाला फायदा मिळू शकतो. त्वचेवर कुठेही खाज येत असेल तर पाण्यात थोडा हींग मिश्रित करून त्या भागावर लावा. याने बॅक्टेरिया नष्ट होती आणि तुम्हाला आराम मिळेल.

रिकाम्या पोटी हींग खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारते, अपचन होत नाही आणि बद्धकोष्ठतेसारखी समस्याही दूर होते. रोज एक चिमुट हींग खाल्ल्याने पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात.

अनेकांना जेवण केल्यावर किंवा काही खाल्ल्यावर पोट फुगण्याची किंवा पोटात गॅसची समस्या होते. अशा लोकांनी हिंगाचं सेवन करावं. रिकाम्या पोटी हींग खाल्ल्याने पोट फुगण्याची आणि गॅसची समस्या दूर होते.

हिंगाच्या सेवनाने ब्लड प्रेशरच्या समस्येतही फायदा मिळतो. रिकाम्या पोटी जर तुम्ही हिंगाचं पाणी प्याल तर ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं. पण सेवनाआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हिंगामध्ये अॅंटी इन्फ्लेमेटरी गुण भरपूर असतात. त्यामुळे याच्या सेवनाने डोकेदुखी दूर होण्यास मदत मिळते. त्यासोबतच सूज असण्याची समस्याही हिंगाने दूर होते.

खोकला, अस्थमा या समस्या असल्यावरही हिंगाचं सेवन केल्यास फायदा मिळतो. यात अॅंटी-वायरल आणि अॅटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. जे श्वासाची समस्या दूर करतात.

डायबिटीस झाला असेल तर खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष द्यावं लागतं. पावसाळ्यात डायबिटीसच्या रूग्णांना इंफ्केशनचा धोका अधिक राहतो. अशात हिंगाचं वेगवेगळ्या पदार्थांमधून हिंगाचं सेवन केलं तर तुम्हाला त्रास होणार नाही.

तुम्ही जर तुमच्या रोजच्या आहारात हिंगाचा योग्य वापर केला तर तुम्हाला किडनीचे आजार होणार नाहीत. हींग शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो.

जर तुम्हालाही दात दुखण्याची समस्या असेल तर तुम्हीही हिंगाचं सेवन करू शकता. यासाठी कोमट पाण्यात थोडा हिंग टाकून दोन ते तीन वेळा गुरळा करा. दाताचं दुखणंही दूर होईल आणि तोंडातील सर्व बॅक्टेरियाही नष्ट होतील.

चिमुटभर हींग एक ग्लास कोमट पाण्यात टाकून सेवन करू शकता. पण जर तुम्हाला काही आजार असेल किंवा काही औषधं घेत असाल तर सेवनाआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.