शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

11 देशांमध्ये 'मंकीपॉक्स'च्या 80 प्रकरणांची पुष्टी; WHO कडून संसर्गाचे कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 9:19 PM

1 / 8
जिनेव्हा : कोरोना व्हायरसनंतर आता मंकीपॉक्स व्हायरसच्या (Monkeypox Virus)वाढत्या रुग्णांमुळे चिंता वाढली आहे. जगातील 11 देशांमध्ये मंकीपॉक्स व्हायरसची 80 प्रकरणे आढळून आली आहेत. याबाबतची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
2 / 8
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना या व्हायरसच्या उत्पत्तीचे कारण आणि त्याच्याशी संबंधित परिणाम अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी काम करत आहे. शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, मंकीपॉक्स व्हायरस काही प्राण्यांमध्ये स्थानिक आजार आहे आणि काहीवेळा स्थानिक लोक आणि प्रवाशांना संक्रमित करतो.
3 / 8
जागतिक आरोग्य संघटना आणि त्याच्या सहयोगींनी सांगितले की, आम्ही मंकीपॉक्सच्या प्रसार आणि प्रभावाच्या क्षेत्राबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी काम करत आहोत. हा व्हायरस काही देशांतील प्राण्यांमध्ये स्थानिक आजार आहे. अलीकडे, 11 देशांमध्ये असामान्य प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि ही सर्व प्रकरणे गैर-स्थानिक आजार असलेल्या देशांमध्ये नोंदवली गेली आहेत.
4 / 8
याचबरोबर, जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, आतापर्यंत जवळपास मंकीपॉक्सच्या 80 प्रकरणांची पुष्टी झाली आहे आणि 50 प्रलंबित प्रकरणांचा तपास सुरू आहे. याशिवाय, सर्व्हिलांस वाढवल्यास ठेवल्यास ही प्रकरणे वाढू शकतात.
5 / 8
दरम्यान, भारतातही मंकीपॉक्स व्हायरसबाबत केंद्र सरकार सतर्क झाले आहे. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, केंद्राने एनसीडीसी आणि आयसीएमआरला परदेशातील मांकीपॉक्सच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आणि बाधित देशांतून येणाऱ्या संशयित आजारी प्रवाशांचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीमध्ये पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
6 / 8
मंकीपॉक्स हा मानवी स्मॉलपॉक्ससारखाच दुर्मिळ विषाणूजन्य संसर्ग आहे. 1958 मध्ये संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांमध्ये तो पहिल्यांदा सापडला होता. मंकीपॉक्सच्या संसर्गाचे पहिले प्रकरण 1970 मध्ये नोंदवले गेले. हा रोग प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय पर्जन्यवनात आढळतो आणि कधीकधी इतर प्रदेशांमध्ये पसरतो.
7 / 8
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मंकीपॉक्स सामान्यतः ताप, पुरळ आणि गाठ सारखा दिसून येतो आणि विविध वैद्यकीय गुंतागुंत होऊ शकतो. रोगाची लक्षणे सहसा दोन ते चार आठवड्यांपर्यंत दिसतात, जी स्वतःच निघून जातात.
8 / 8
शास्त्रज्ञांच्या मते, हा फारसा गंभीर नसला तरी काळजी घेण्याची गरज आहे. त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि सामान्य सुस्ती यांचा समावेश आहे
टॅग्स :Healthआरोग्यWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना