शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दातांचं आरोग्य जपायचं आहे, मग या 6 सवयी लावून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 7:12 PM

1 / 7
दैनंदिन आयुष्यात आपण शरीराच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींकडे बारकाईनं लक्ष देत असतो. चेहरा-केस सुंदर दिसावेत, यासाठी आपण त्यांची योग्य ती काळजी घेतो. निरनिराळ्या प्रकाराचे लेप लावतो, हेअर मास्कचा वापर करतो. फळांचा, त्यांच्या रसांचं सेवन करत असतो. बाह्य सौंदर्य कायम टिकून राहावं, म्हणून आपण हरेत-हेचं प्रयत्न करत असतो. मात्र हे सर्व करत असताना शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण भूमिका बजावणा-या दातांकडे तुमचे पूर्ण लक्ष आहे का? जर नसेल तर वेळीच निगा राखण्यास सुरुवात करा. दातांच्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी या सवयी वेळीच लावून घ्या
2 / 7
1. दातांची नियमित तपासणी – दातांचं कोणतंही दुखणं सुरू झाल्यानंतरच आपण डॉक्टरांकडे जातो. पण तसं न करता दर सहा महिन्यांनी डॉक्टरांकडे जाऊन दातांची तपासणी करावी.
3 / 7
2. दिवसातून 2 वेळा ब्रश करा – दिवसातून किमान दोन वेळा दातांना ब्रश करावा. दात स्वच्छ करण्यासाठी बोटांऐवजी ब्रशचाच वापर करावा. शिवाय, दंतमंजनऐवजी टुथपेस्टच वापरावी, कारण पावडरनं दात कधीही संपूर्ण स्वच्छ होत नाहीत. सकाळी झोपेतून उठल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी ब्रश केल्यानं दात निरोगी राहतात.
4 / 7
3. पदार्थ खाल्ल्यानंतर नीट चूळ भरावी – दातांची स्वच्छता म्हणजे केवळ ब्रश करणं असं नाही. दात स्वच्छ असले तरीही बऱ्याच तोंडाला दुर्गंधी येत असतेच. त्यामुळेच कोणता पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच चूळ भरुन तोंड व दात स्वच्छ करावेत. पदार्थांचे कण दातात अडकल्यानं तोंडाला दुर्गंधी येते व दात किडण्याचाही धोका असतो. त्यामुळे काहीही खाल्ल्यानंतर त्वरीत तोंड स्वच्छ करावे.
5 / 7
4.खाण्याच्या सवयी – निरोगी दातांसाठी खाण्याच्या सवयीही चांगल्या असाव्या लागतात. कारण कोणताही पदार्थ खाताना दातांनीच चावावा लागतो. म्हणून कॉफी, चहा किंवा शीतपेयांचं अतिसेवन करू नये. कारण त्यामुळे दात लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसंच रोज सुपारी किंवा मुखवास चघळल्यानेही दात खराब होतात.
6 / 7
5. जिभेची स्वच्छता राखा – दातांसोबतच आपल्याला जिभेचीही काळजी घेणं गरजेचं असतं. दात स्वच्छ करत असताना जीभदेखील स्वच्छ करा. जेणेकरून आपले दात व जीभ दोन्हीही निरोगी राहतील. ब्रश करताना जीभही साफ करणं गरजेचं असतं
7 / 7
6.हिरड्यांची काळजी – दातांचं आरोग्य मजबूत हिरड्यांवर अवलंबून असतं. त्यामुळे दात निरोगी असावेत, असं वाटत असल्यास हिरड्यांचं आरोग्यचंही आरोग्य जपणं आवश्यक आहे. हिरड्यातून येणारे रक्त, हिरड्यांना आलेली सूज यामुळे दातांचे विकार उद्भवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हिरड्या निरोगी राहव्यात यासाठी भरपूर प्रमाणात क्षार आणि प्रथिनांची आवश्यकता असते. यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्यावे व आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य