शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या 5 गोष्टी फ्रिजमध्ये ठेवणं आरोग्यास हानिकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 3:34 PM

1 / 5
काही जणांना फ्रिजमध्ये ब्रेड ठेवण्याची सवय असते. पण ब्रेड ब्राऊन असो वा व्हाईट ते फ्रिजमध्ये कधीही ठेवू नये. फ्रिजमध्ये ठेवल्याने ब्रेडची टेस्ट तर बदलतेच शिवाय थंडीमुळे त्यात जंतूसुद्धा होऊ लागतात. त्यामुळे तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
2 / 5
कॉफी तयार असो वा पावडर स्वरुपात ती फ्रिजमध्ये ठेवू नये. याचं कारण म्हणजे कॉफी दुसऱ्या पदार्थाचा स्वाद ओढून घेते. त्यामुळे कॉफी बेचव लागते आणि त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
3 / 5
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याचं आवरण निघू लागते आणि त्यामुळे टोमॅटो खराब होतात. अशा टोमॅटोंचं सेवन केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
4 / 5
केळी कधीही फ्रिजमध्ये ठेवू नयेत. कारण ती काळी पडतात. यामुळे पोट बिघडण्याची शक्यता असते.
5 / 5
मध फ्रिजमध्ये ठेवल्याने अधिक घट्ट होतं आणि त्यातील पोषक तत्त्वेही कमी होतात.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न