गोव्यात अवतरली किंग मोमोची राजवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 21:08 IST2018-02-10T21:03:24+5:302018-02-10T21:08:45+5:30

गोव्यात मिरामार ते दोनापावल रस्त्यावर झालेल्या कार्निव्हलचा देशी-विदेशी पर्यटकांनी आनंद लुटला.

‘खा प्या मजा करा’ असा संदेश देणा-या किंग मोमोची राजवट शनिवारपासून गोव्यात सुरू झाली.

यंदाच्या मिरवणुकीत पर्यावरण वाचविण्याबरोबर समुद्री जिवसंपदा संरक्षण करण्याचा संदेश देणारा चित्ररथ लोकांचे आकर्षण ठरला.

सायंकाळी साडेचार वाजता विज्ञान सेंटरपासून या मिरवणुकीस प्रारंभ झाला. किंग मेमोच्या भूमिकेत डान्सर ब्रुनो अझारेदो होते.