विजयाच्या जोशात खेळाडू 15 मॉडल्ससोबत पार्टीला गेले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 10:33 AM2020-01-17T10:33:26+5:302020-01-17T10:36:23+5:30

विजयाच्या आनंदात खेळाडू काय करतील याचा नेम नाही... त्यात हा आनंद जर कट्टर प्रतिस्पर्धींवर मिळवलेल्या दणदणीत विजयाचा असेल, तर मग जल्लोष झालाच पाहिजे.

मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबच्या खेळाडूंनी असाच जल्लोष करताना तब्बल 15 मॉडल्ससोबत इटलीत पार्टी केल्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. मँचेस्टर सिटीनं 6-1 अशा फरकानं अॅस्टन व्हिला क्लबवर दणदणीत विजय मिळवला.

इंग्लिश प्रीमिअर लीगच्या विजेत्या मँचेस्टर सिटीच्या खेळाडूंनी इंस्टाग्रामवरील 15 प्रसिद्ध मॉडेल्सना पार्टीसाठी बोलावल्याचे वृत्त अनेक मीडियानं प्रसिद्ध केले.

या मॉडेल्सनं पॅराशूटद्वारे खेळाडू थांबलेल्या हॉटेल्समध्ये दाखल झाल्याचा दावा डॅगोस्पीया या मॅगझीननं केला. त्यामुळे आता या खेळाडूंवर बंदीच्या कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या मॉडेल्सना चेशायर येथील एका महागड्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते.

या मॉडेल्सना शोधण्याचे काम दोन इटालियन PR एजंसीला दिल्याचे वृत्तही आहे. या एंजसीकडेच मॉडेल्सच्या प्रवासाचा आणि राहण्याची व्यवस्था करून घेण्यात आली होती.

सामना संपल्यानंतर या सर्व मुलींना एका बसमध्ये बसवून मँचेस्टर सिटीच्या खेळाडूंकडे नेण्यात आले आणि तेथे पार्टी झाली.

विशेष म्हणजे खेळाडूंच्या या प्रतापाची माहिती प्रशिक्षक पेप गॉर्डीया यांना होती. या मॉडेल्सपैकी एक अमीरा पॉला हीनं सोशल मीडियावर या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत.