मित्राच्या बहिणीच्या प्रेमात पडला लिओनेल मेस्सी, लग्नाआधीच झाला दोन मुलांचा बाप!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 05:26 PM2020-06-17T17:26:59+5:302020-06-17T17:31:12+5:30

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक लिओनेल मेस्सी त्याच्या शांत स्वभावामुळे ओळखला जातो. फुटबॉलच्या मैदानावरील त्याचे कौशल्य कोणालाही मंत्रमुग्ध करणारे आहे.

अर्जेंटिना आणि बार्सिलोनाचा स्टार खेळाडू मेस्सीची लव्हस्टोरी फारच कमी लोकांना माहीत आहे. ती कोणत्याही सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाहीये.

मेस्सी हा चाहत्यांमध्ये एक फारच लाजरा व्यक्ती म्हणून लोकप्रिय आहे. पण रिअल लाइफमध्ये मेस्सी फार बोल्ड आणि रोमॅंटिक व्यक्ती आहे. चला जाणून घेऊया मेस्सीची रोमांचक लव्हस्टोरी....

स्टार खेळाडूंच्या वेगवेगळ्या अफेअरबाबत नेहमी चर्चा होत असते. पण मेस्सीचा आजपर्यंत केवळ एका मुलीवर जीव जडलाय. ती म्हणजे मॉडल एंटोनेला रोकुजो. एंटोनेला ही मेस्सीचा मित्र लुकास स्कागलिया याची मावस बहिण आहे.

आपल्या देशासाठी सर्वात जास्त गोल करणाऱ्या मेस्सीवर जगभरातील लाखों तरुणी जीव ओवाळतात. पण मेस्सी हा एंटोनेलावर फिदा आहे.

अनेकवर्ष लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मेस्सीने आपली लव्हस्टोरी एका रेडिओवर सांगितली होती.

मेस्सी आणि एंटोनेलो हे एकमेकांना पाच वर्षांचे असतानापासून ओळखतात आणि 20 वय असतानापासून एकमेकांना डेट करत होते.

दोघांचं लग्नही फार साध्या पद्धतीने झालं. महत्वाची बाब त्यांनी त्यांचं वेडिंग गिफ्ट म्हणून लियो मेस्सी फाऊंडेशनला डोनेशन करण्याचा निर्णय घेतला होता.

लग्नाआधी मेस्सी आणि त्यांची पत्नी एंटोनेलो हे लिव्ह इनमध्ये राहत होते. लग्नाआधीच त्याच्या दोन मुलांनी जन्म घेतला होता. त्याच्या दोन मुलांची नावे थियागो आणि मेटियो अशी आहेत.

मेस्सी त्याच्या प्रेयसीची गर्भवती होण्याची कुहाणीही एका वेगळ्याच अंदाजात सांगितली होती.

2012 मध्ये एका सामन्यात मेस्सीने हॅट्रिक लगावली होती. आपल्या या हॅट्रिकवर तो आनंदाने नाचत होता. यावेळी अचानक त्याने बॉल आपल्या टी-शर्टच्या आत ठेवला.

मेस्सीचं हे असं करणं अनेकांना बुचकळ्यात टाकणारं होतं. पण नंतर तो बाबा होणार हे सर्वांना कळालं होतं.