स्टार फुटबॉलपटूनं पत्नीला सोडचिठ्ठी देऊन थाटला भाचीसोबत संसार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 04:00 PM2020-08-08T16:00:26+5:302020-08-08T16:03:05+5:30

ब्राझिलचा स्टार फुटबॉलपटू गिव्हानिल्डो विएरा डी सोसा याला त्याच्या शरीरयष्टीमुळे 'हल्क' असे संबोधले जाते.

आतापर्यंत त्यानं जपान, पोर्तुगाल, रशिया आणि चीन आदी देशांतील विविध क्लब्सचे प्रतिनिधित्व केले आहे.

चीनमधील शांघाय एसआयपीजी क्लबनं त्याला 16.6 मिलियन पाऊंड ( प्रतीवर्ष) एवढी मोठी रक्कम देऊन चायनीज सुपर लीगसाठी 2016मध्ये करारबद्ध केलं होतं.

आता त्याचा करार संपुष्टात आला असून पुढील वर्षी हल्क इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

पण, 34 वर्षीय हल्क सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. त्यां त्याच्या पत्नीला सोडचिठ्ठी दिली.

विशेष म्हणजे पत्नीच्या भाचीसोबत लग्न करण्यासाठी त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं.

हल्क आणि इराना अँजेलो यांनी 12 वर्षांचा संसार मोडला. त्यानंतर त्याचे 31 वर्षीय कॅमिला अँजेलोसोबत प्रेम प्रकरण असल्याचे उघड झाले.

ऑक्टोबर 2019मध्ये या दोघांनी प्रेमाची कबुली दिली आणि मार्च महिन्यात त्यांनी लग्न केलं.

या दोघांनी लग्नाची घोषणा केली. या दोघांनी अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केली होती.