शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Fifa World Cup Final: दीपिकाच्या हाती 'वर्ल्ड' कप! आतापर्यंत जे कुणालाच नाही जमलं ते बॉलिवूड अभिनेत्रीनं केलं

By मुकेश चव्हाण | Published: December 18, 2022 9:37 PM

1 / 6
आज अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात फिफा वर्ल्डकपची फायनल होत आहे. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला मेस्सीच्या पासवर ज्युलियन अलव्हारेजने बायसिकल किक मारून पेनल्टी क्षेत्रात गोल करण्याचा प्रयत्न केला. फ्रान्सच्या गोलीने तो रोखला, परंतु रेफरीने ऑफ साईडचा फ्लॅग उचलला होता. पाचव्या मिनिटाला अर्जेंटिनाकडून ऑन टार्गेट प्रयत्न झाला. अर्जेंटिनाने आज आक्रमक पवित्रा घेतलेला दिसला.
2 / 6
सांघिक खेळ कसा करावा याचं उत्तम उदाहरण ३६व्या मिनिटाला अर्जेंटियन खेळाडूंनी दाखवून दिले. मॅक एलिस्टर चेंडू ज्या पद्धतीने घेऊन पेनल्टी क्षेत्रात घेऊन गेला त्याला रोखण्यासाठी फ्रान्सची फौज उभी राहिली, परंतु त्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधलेय हे दिसताच चेंडू डी मारियाला दिला अन् अर्जेंटिनाची आघाडी २-० अशी झाली. मारियाने २०२२, २०१८ व २०१४ या तीनही वर्ल्ड कप स्पर्धेच्या नॉक आऊट सामन्यात गोल केले. १९३० आणि २०१८नंतर वर्ल्ड कप फायनलमध्ये ३४+ वय असलेल्या दोन खेळाडूंनी आज गोल केले. पहिल्या हाफमध्ये फ्रान्स हताश झालेले दिसले.
3 / 6
विशेष म्हणजे या ऐतिहासिक सामन्याच्या ट्रॉफी अनावरण सोहळ्यासाठी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण निमंत्रण देण्यात आलं होतं.
4 / 6
ट्रॉफी अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे.
5 / 6
दीपिकासोबत स्पॅनिशमधील दिग्गज इकर कॅसिलास देखील समील झाले होते.
6 / 6
शाहरूख खान व दीपिका पादुकोण यांच्या ‘पठाण’ सिनेमातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरून सध्या वातावरण तापलं आहे. कारण आहे, या गाण्यात दीपिकाने घातलेली भगव्या रंगाची बिकिनी. दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचं काही लोकांचा आक्षेप आहे आणि यावरून अनेकांनी दीपिका व शाहरूखवर टीका चालवली आहे. अर्थात या सगळ्या वादात दीपिकाची बाजू घेणारेही काही जण आहेत.
टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Deepika Padukoneदीपिका पादुकोणbollywoodबॉलिवूड