Euro 2020 : फ्रान्स-जर्मनी सामना सुरू असताना अनुभवायला मिळाला थरार, आकाशातून आलं संकट अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 01:21 PM2021-06-16T13:21:13+5:302021-06-16T13:27:32+5:30

Euro 2020 : फ्रान्स आणि जर्मनी यांच्यातल्या सामन्यात स्वयंगोलमुळे जर्मनीला हार मानावी लागली. मॅट हुम्मेल्स याच्याकडून 20व्या मिनिटाला झालेल्या स्वयंगोलनं फ्रान्सला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली अन् त्यानंतर जर्मनीला बरोबरीचा गोल करता आला नाही.

या सामन्यात एक थरारक अनुभवही खेळाडूंनी अनुभवला. स्टेडियमच्यावरून जाणारा पॅराग्लायडर स्पायडरकॅमच्या वायरमध्ये अडकला अन् तो एकाऐकी स्टेडियमच्या आत कोसळला. त्याचा हा थरार कॅमेरात कैद झाला.

मैदानावर लँड करण्यापूर्वी त्यानं काही प्रेक्षकांना दुखापतग्रस्त केलं अन् त्यामुळे दोन प्रेक्षकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.

फ्रान्सचे मॅनेजर डिडिएर डेश्चॅम्प हेही डगआऊटच्या दिशेनं धावले..