शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

OMG : इटालियन फुटबॉल फॅन्सच्या चाहत्या अँकरच्या घरी चोरी; 1.27 कोटींच्या वस्तू लंपास!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 11:58 AM

1 / 11
इटलीची प्रसिद्ध क्रीडा पत्रकार डॉयल्टा लेओटा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
2 / 11
या सुंदर अँकरच्या घरी चोरी झाली असून तिच्या घरातून 1.27 कोटींचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा दावा तिनं केला आहे.
3 / 11
त्यात महागडे घड्याळ, रोख रक्कम आणि दागिन्यांचा समावेश आहे.
4 / 11
डॉयल्टा हिचं मिलान येथे अपार्टमेंट आहे. घरी चोरी झाली, तेव्हा ती एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेली होती.
5 / 11
वृत्तानुसार डॉयल्टाच्या घरातून 8 घड्याळं, त्यात रोलेक्सचाही समावेश होता. दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे.
6 / 11
इटालियन फुटबॉल फॅन्समध्ये डॉयल्टा प्रचंड प्रसिद्ध आहे. सीरि ए लीग मॅच कव्हर करण्यासाठी ती स्टेडियवर नेहमी उपस्थित असते.
7 / 11
पण, या सुंदर अँकरसोबत स्टेडियमवर गैरवर्तवणूकही झाली होती.
8 / 11
गतवर्षी नॅपोली आणि ब्रेशिया यांच्यातला सामना सॅन पाऊलो स्टेडियमवर खेळवण्यात आला होता.
9 / 11
तेथे नॅपोलीच्या चाहत्यांनी तिच्यासोबत गैरवर्तवणूक केली होती आणि तिला स्टेडियममध्येच टी-शर्ट काढण्याची मागणी केली होती.
10 / 11
तिनंही त्या फॅन्सला उत्तर दिले. तिनं त्यांच्याकडे स्मित हास्य केले आणि अंगठा खाली करून दाखवला.
11 / 11
तिनंही त्या फॅन्सला उत्तर दिले. तिनं त्यांच्याकडे स्मित हास्य केले आणि अंगठा खाली करून दाखवला.
टॅग्स :FootballफुटबॉलItalyइटली