FIFA Football Awards 2019 : LGBTQ महिला फुटबॉलपटूनं पटकावला Fifa चा सर्वोत्तम पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 04:08 PM2019-09-24T16:08:55+5:302019-09-24T16:11:13+5:30

अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी आणि अमेरिकेच्या मीगन रॅपिनोए यांनी फिफाचा 2019सालचा अनुक्रमे सर्वोत्तम पुरुष व महिला फुटबॉलपटूचा मान पटकावला. अमेरिकेला ऐतिहासिक विश्वविजेतपद जिंकून देण्यात मीगनची निर्णायक भूमिका राहिली आहे.

मेस्सी आणि मीगन यांच्यासह अमेरिकेच्या वर्ल्ड कप विजेत्या महिला संघाचे प्रशिक्षक जीत एलिस, लिव्हरपूरचे प्रशिक्षक जुर्गन क्लोप यांना सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार मिळाला.

मेस्सीनं सहाव्यांदा फिफाचा सर्वोत्तम पुरस्कार पटकावला, तर मीगनला प्रथमच या पुरस्काराने गौरविण्यात आले.

मीगनने महिला वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल करून गोल्डन बूट आणि गोल्डन बॉलचा पुरस्कार पटकावला आहे.

मीगन ही LGBTQ ( समलैंगिक) खेळाडू आहे. अमेरिकेची बास्केटबॉलपटू स्यू बर्डशी तिचे प्रेमसंबंध आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पना तिनं खुलं आव्हान दिलं होतं. त्यानंतर मीगन जगभरात प्रसिद्ध झाली होती.