शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'ही' फळं टिकावायची असतील तर चूकूनही नका ठेऊ फ्रीजमध्ये, होतील उलट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 5:17 PM

1 / 10
सफरचंद फ्रीजमध्ये ठेवल्यास ते लवकर पिकतं. यामागील कारण म्हणजे सफरचंदांमध्ये आढळणारी अॅक्टिव्ह एन्झाईम्स, ज्यामुळे सफरचंद वेगाने पिकते. त्यामुळे सफरचंद फ्रीजमध्ये ठेवू नका.
2 / 10
आपणास हे माहितच असेल की संत्र्यात भरपूर प्रमाणात सायट्रिक अॅसिड आहे. हे इतर फळं आणि अन्न देखील खराब करू शकते.
3 / 10
केळी हे असे फळ आहे की तुम्ही ते कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये केळी ठेवल्यास त्वरीत काळी पडते. केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातून इथिलीन गॅस सोडला जातो. ज्यामुळे फ्रिजमध्ये असलेले इतर फळे देखील लवकर पिकतात. म्हणून केळी कधीही फ्रीजमध्ये किंवा इतर फळांसोबत ठेवू नका.
4 / 10
आंबे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. आंबे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांच्यातील अँटीऑक्सिडंट कमी होऊ लागतात. यामुळे आंब्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. आंबे कार्बाईडने पिकवले जातात आणि कार्बाईड पाण्यात मिसळल्यास आंबे लवकर खराब होतात.
5 / 10
कलिंगड उन्हाळ्यात जास्त खाल्ले जातात. पण, हे फळ कापल्यानंतर फ्रिजमध्ये मुळीच ठेवू नयेत. कलिंगडात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील अँटीऑक्सिडंट्सचा नाश होतो.
6 / 10
उन्हाळ्यात स्वादिष्ट वाटणारं लिची फळ चुकूनही फ्रिजमध्ये ठेवून नका. फ्रिजमध्ये लीची ठेवल्यास त्याचा वरचा भाग सारखाच राहतो, परंतु आतला भाग (पल्प) खराब होऊ लागतो. त्यामुळे फळ खाण्यायोग्यही राहत नाही.
7 / 10
लिंबामध्ये सायट्रीक ऍसिड असतं. त्यामुळे फ्रिजमध्ये टिकत नाहीत. त्यातील रसही कमी होतो.
8 / 10
बऱ्याच वेळा लोक टरबूज, खरबूज कापल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवतात. जे चुकीचे आहे. टरबूज आणि खरबूज कधीही कापून फ्रिजमध्ये ठेवू नये. ही फळं फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांच्यातील अँटीऑक्सिडंट नष्ट होतात.
9 / 10
बिया असणारी फळे चेरी, पीच हे देखील फ्रीजमध्ये ठेवू नयेत. ही फळे नाशवंत असतात आणि फ्रीजमध्ये आणखी खराब होतात.
10 / 10
अव्हॉकाडो फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नये. त्यामुळे ते लवकर पिकते तसेच त्याची साल टणक होते.
टॅग्स :foodअन्न