शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्टार फ्रुट ठरतं आरोग्यदायी; हिवाळ्यामध्ये होतात अनेक फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 3:25 PM

1 / 6
हिवाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. कारण थंडीमध्ये आजार होण्याचा धोका अधिक असतो. परंतु याऐवजी अनेक समस्या उद्बवतात. अशातच थंडीमध्ये सहज मिळणारं आबंट-गोड फळ म्हणजे स्टार फ्रुटचं सेवन करणं या समस्यांवरील उपाय ठरू शकतो. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी6 मुबलक प्रमाणात असतं. त्याचबरोबर यामध्ये पोटॅशियम, झिंक, कॅल्शिअम आणि फायबरही आढळून येतं. याचं सेवन केल्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम्स दूर होतात. जाणून घेऊया थंडीमध्ये स्टार फ्रुट खाण्याचे फायदे...
2 / 6
भूक वाढविण्यासाठी - थंडीमध्ये काही लोकांना तहान भूक फार कमी लागते. ज्यामुळे शरीर कमजोर होतं. तसेच शरीरालाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. असातच सकाळी स्टार फ्रुटचा ज्यूस प्यायल्याने फायदा होतो. तुम्हाला गरज असल्यास ज्यूस तयार करताना साखरही वापरू शकता. तुम्हाला 3 ते 4 दिवसांमध्येच फरक दिसू लागेल.
3 / 6
हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी - स्टार फ्रुटमध्ये असणारे व्हिटॅमिनी बी 9, अॅन्टी- ऑक्सिडंट आणि फोलिक अॅसिड हृदयाचे आजार दूर ठेवण्यासाठी मदत करतं. याव्यतिरिक्त नियमितपणे याचे सेवन केल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
4 / 6
कोंड्यापासून सुटका - थंडीत केसांमध्ये कोंडा होतो. अशातच स्टार फ्रुट आणि बदामाचं तेल एकत्र करून आठवड्यातून दोन वेळा लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते. तसेच केस चमकदार आणि मुलायम होण्यासही मदत होते. (Image Creadit:video.self.com)
5 / 6
डोळ्यांसाठी फायदेशीर - मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन बी 6 मधील गुणधर्मांमुळे स्टार फ्रुट डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतं. यामुळे डोळ्यांना सूज, वेदना, पाणी येणं आणि डोळ्यांची दृष्टी कमी होणं यांसारख्या समस्या होतात.
6 / 6
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी - पोषक त्तव आणि व्हिटॅमिन सीच्या गुणधर्म असलेल्या स्टार फ्रुटच्या सेवनाने शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत होते. ज्यामुळे शरीरामध्ये एनर्जी लेव्हल वाढण्यासाठीही मदत होते. (Image Creadit:everydayhealth.com)
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य