काय होतीस तू काय झाली तू, सिनेसृष्टीतून गायब आहे ही अभिनेत्री, आता ओळखणेही झाले कठिण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 10:04 IST2020-03-06T09:57:52+5:302020-03-06T10:04:35+5:30

2008मध्ये प्रीतीने अभिनेता आणि मॉडेल परवीन डबाससह लग्न करत आपला संसार थाटला.रुपेरी पडद्यावर जादू चालली नसली तरी अगदी लॅविश लाईफ ती जगत आहे. तिच्या कुटुंबियासोबत ती क्लॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसते.

काही कलाकार चित्रपटसृष्टीत कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरूवातीच्या काळात यश मिळतं, नंतर मात्र ते कुठे जातात हे कळत नाही.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे 2000मध्ये प्रदर्शित झालेला मोहब्बते सिनेमामधील अभिनेत्री प्रीती झांगियानी.

या सिनेमातील तिच्या भूमिकेला रसिकांनी खूप पसंती दिली होती. याच सिनेमाने ती ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली होती.

यानंतर आवारा, पागल, दीवाना, वाह तेरा क्‍या कहना, अनर्थ, बाज, एलओसी कारगिल, आन: मेन ऐट वर्क,, सौदा, चाहत, चांद के पार चलो असे सिनेमातही ती झळकली.

2013मध्ये काश तुम होते या हिंदी सिनेमात तिचे शेवटचे दर्शन घडले.

प्रतीने तेलुगू, कन्‍नड़, पंजाबी, बंगाली, राजस्‍थानी, मलयालम या भाषांतील सिनेमातही काम केले आहे. मात्र या सिनेमांनाही फार चांगले यश मिळाले नाही.

2008मध्ये प्रीतीने अभिनेता आणि मॉडेल परवीन डबाससह लग्न करत आपला संसार थाटला.

2011 मध्ये तिने तिचा मुलगा जयवीरला जन्म दिला. 2016 मध्ये दुसरा मुलगा देवचा जन्म झाला.

रुपेरी पडद्यावर जादू चालली नसली तरी अगदी लॅविश लाईफ ती जगत आहे. तिच्या कुटुंबियासोबत ती क्लॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसते.