'सावळ्यांची जणू सावली' मालिकेतील सावलीने वारीत केला हरी नामाचा गजर!, शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 12:54 IST2025-06-26T12:51:34+5:302025-06-26T12:54:57+5:30
Prapti Redkar : आषाढी एकादशी पंढरपूर वारीची महाराष्ट्रात परंपरा आहे. दरवर्षी लाखो वारकरी वारीत सहभागी होतात. अनेक सेलिब्रिटीही दरवर्षी वारीमध्ये सहभागी होताना दिसतात. यंदा 'सावळ्यांची जणू सावली' मालिकेतील सावलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर देखील सहभागी झाली होती.

आषाढी एकादशी पंढरपूर वारीची महाराष्ट्रात परंपरा आहे. दरवर्षी लाखो वारकरी वारीत सहभागी होतात. अनेक सेलिब्रिटीही दरवर्षी वारीमध्ये सहभागी होताना दिसतात. यंदा 'सावळ्यांची जणू सावली' मालिकेतील सावलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राप्ती रेडकर देखील सहभागी झाली होती.
सावली म्हणजेच प्राप्ती रेडकर हिने जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्राप्तीने फोटो शेअर करत राम कृष्ण हरी कॅप्शनमध्ये लिहिले. या फोटोत ती त्या भक्तीमय वातावरणात दंग झालेली पाहायला मिळत आहे.
प्राप्ती रेडकर वारीमध्ये सावलीच्या गेटअपमध्ये पाहायला मिळाली. यावेळी तिने मरुन रंगाची साडी नेसली होती.
हातात टाळ, नाकात नथ आणि कपाळी टिळा अशा लूकमध्ये सावलीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्राप्ती रेडकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
प्राप्ती रेडकरच्या 'सावळ्यांची जणू सावली' मालिकेला कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली.
सावलीच्या भूमिकेतून प्राप्तीला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेनंतर तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.