Alizeh Agnihotri: सलमानच्या भाचीचा साधेपणा पाहून फॅन्स फिदा, प्रत्यक्षात आहे खूपच बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 00:22 IST2023-01-21T00:19:18+5:302023-01-21T00:22:49+5:30

Alizeh Agnihotri:मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी याच्या साखरपुड्याला अनेक सेलेब्रेटी पोहोचले होते. त्यामध्ये सलमान खानची भाजी अलिजेह अग्निहोत्री हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री लवकरच अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी याच्या साखरपुड्याला अनेक सेलेब्रेटी पोहोचले होते. त्यामध्ये सलमान खानची भाजी अलिजेह अग्निहोत्री हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सलमानसोबत ती पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली होती.

या कार्यक्रमात अगदी सिंपल लुकमध्ये दिसलेल्या अलिजेहच्या साधेपणाने सर्वांचं मन जिंकलं. मात्र ती प्रत्यक्ष जीवनात खूपच बोल्ड आहे.

इन्स्टाग्रामवर ती नेहमी तिची स्टाइल दाखवत असते. तिथून तिच्या बोल्डनेसचा अंदाज लावता येऊ शकतो. अलिजेह सूरज बडजात्याच्या चित्रपटामधून बॉलिलूडमध्ये पदार्पण करणार आहे.

अंबानींच्या पार्टीमध्ये सलमानने भाचीला अशा प्रकारे आणणे आणि मीडियासमोर फोटोसेशल करणे हे तिच्या प्रमोशनचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे.

अलिजेह ही सनी देओलचा मुलगा राजवीर देओलसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा एक रोमँटिक चित्रपट असेल. सलमान खानच्या कुटुंबीयांमध्ये त्याच्याएवढं यश कुणालाही मिळालेलं नाही. अशा परिस्थितीत अलिजेहकडून यशस्वी कारकिर्दीची अपेक्षा आहे. आता स्टाइल आणि सौंदर्यामध्ये तिने पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. आता तिचा अभिनय कसा असेल, याकडे फॅन्सचे लक्ष लागले आहे.