सोशल मीडियावर आर्चीचे नववधूप्रमाणे नटलेले फोटो, चाहते म्हणतायेत 'सैराट झालं जी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 13:14 IST2021-11-09T13:05:27+5:302021-11-09T13:14:28+5:30

रसिकांची लाडकी 'आर्ची' म्हणजेच रिंकु राजगुरु ही सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेचा विषय ठरली आहे.

रिंकू राजगुरू सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

निमित्त ठरले ते म्हणजे तिचे फोटो. हे फोटो आहेत चक्क वधूरुपातील.

सध्या रिंकुच्या सिनेमाची चर्चा नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांशी संवाद साधत असते.

यानिमित्ताने आपल्या लाडक्या अभिनेत्रीशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी रसिकांना मिळते.

नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या रिंकुचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे.

लाल रंगाच्या लेंहग्यामध्ये रिंकुचं सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे.

हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

हे फोटो पाहून नेटकरी तिच्या या लुकवर फिदा झाले आहेत.

रिंकुचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.