रातोरात 'ती' झाली गायिका अन् चित्रपटात मिळाली गाण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 18:05 IST2019-08-25T18:02:23+5:302019-08-25T18:05:42+5:30

एखाद्या सामान्य व्यक्तीला रातोरात ‘इंटरनेट स्टार’ बनविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे.

याचेच उदाहरण म्हणून राणू मंडल ही गायिका प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. लता मंगेशकर यांचे गाणे ‘एक प्यार का नगमा’ गात राणू लाइमलाइटमध्ये आली.

विशेष म्हणजे हिमेश रेशमियाने तिला आपल्या चित्रपटाच गाण्याची संधी दिली आहे.

राणू मंडलच्या अगोदरही अनेक जण सोशल मीडियाद्वारा हिट झाले आहेत. हिमेशनं रानूसोबत गाण्याचं रेकॉर्डिंग करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओत रानू 'तेरी मेरी कहानी' हे गाणं गाताना दिसतेय. राणू लवकरच हिंदी रियालिटी शो 'सुपरस्टार सिंगर'च्या आगामी भागात दिसणार आहे.