बाप रे बाप, इतक्या कोटी संपत्तीचे मालक आहेत महेश मांजरेकर, जाणून घ्या आकडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 15:27 IST2021-09-30T15:21:19+5:302021-09-30T15:27:33+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे आणि प्रसिद्ध तसंच लोकप्रिय नाव म्हणजे महेश मांजरेकर. एक अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून महेश मांजरेकर सुपरहिट ठरले आहेत.

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही महेश मांजरेकर यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

महेश मांजरेकर संपत्तीच्याबाबतीतही आघाडीवर आहेत.

त्यांच्या संपत्तीचा आकडा जाणून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.

त्यांच्या एकूण संपत्तीचा आकडा जळपास ३६ कोटी इतका असल्याचे बोलले जाते.

सिनेमा जाहिराती तसेच मराठी बिग बॉससारखे टीव्ही शोचे होस्ट करणे हेच त्यांच्या मुख्य कमाईचे साधन आहे.

बऱ्याच महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत.अतिशय आलिशान आयुष्य ते जगतात.

महेश मांजरेकर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं देखील अभिनयक्षेत्रात नशीब आजमवत आहेत.

















