'माझी तुझी रेशीमगाठ'मधील नेहाचे साडीतील फोटोशूट पाहून यशच नाही तर चाहतेही झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 17:47 IST2022-06-20T17:37:03+5:302022-06-20T17:47:24+5:30

Mazi Tuzi Reshimgath: 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नुकतेच यश आणि नेहा यांचा लग्न सोहळा पार पडला.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazi Tuzi Reshimgath) ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. या कलाकारांमुळे मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.

या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही नेहा कामतची भूमिका साकारत आहे. नुकतेच या मालिकेत नेहा आणि यशचे लग्न मोठ्या दिमाखात पार पडले आहे. त्यामुळे मालिकेत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दरम्यान, लग्नानंतर मालिकेत नेहाचा नवा लूक समोर आला आहे. या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे

नेहा म्हणजेच प्रार्थना बेहरेने इंस्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

या फोटोशूटमध्ये प्रार्थनाने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे आणि गळ्यात नेकलेस घातला आहे.

प्रार्थना बेहरेचा साडीतील हा लूक चाहत्यांना खूपच भावतो आहे.

प्रार्थना बेहरेचे साडीतील फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.