'मार्टिन' चित्रपटाचा टीझर पाहून 'केजीएफ २' आणि 'कंतारा' विसराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 19:14 IST2023-02-24T19:14:18+5:302023-02-24T19:14:18+5:30

मार्टिनसह अ‍ॅक्शन मनोरंजनासाठी सज्ज व्हा! एपी अर्जुन दिग्दर्शित या चित्रपटात अ‍ॅक्शन प्रिन्स ध्रुव सर्जा दिसणार आहे. वासवी एंटरप्रायझेस बॅनरखाली उदय के मेहता निर्मित, भारतातील सर्वात मोठ्या अ‍ॅक्शन चित्रपटाची बंगळुरू घोषणा करण्यात आली.

या कार्यक्रमात लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाला ध्रुव सर्जा, अर्जुन सर्जा, वैभवी शांडलिया, अन्वेश जैन, उदय मेहता आणि एपी अर्जुन उपस्थित होते. फर्स्ट लुक दाखवण्याव्यतिरिक्त, मार्टिनच्या टीमने मीडियाशी दीर्घ संवाद साधला.

ध्रुव सर्जाने एपी अर्जुनच्या अधुरीमधून पदार्पण केले आणि मार्टिनने त्यांना पुन्हा एकत्र आणले.

रवि वर्मा आणि राम लक्ष्मण यांनी कोरिओग्राफ केली आहे. या चित्रपटाचे संगीत मणि शर्मा यांनी दिले आहे.

उदय के मेहता प्रॉडक्शन, एपी अर्जुन दिग्दर्शित आणि ध्रुव सर्जा, वैभवी शांडिल्य, अन्वेशी जैन अभिनीत, बहुभाषिक अ‍ॅक्शन सागा मार्टिन कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदीमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.

या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.