जिनिलिया आणि रितेश देशमुखच्या ख्रिश्चन वेडिंगचा अल्बम आला समोर, पाहा आतापर्यंत न पाहिलेले हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:26 IST2025-06-26T17:18:49+5:302025-06-26T17:26:06+5:30

Genelia Deshmukh and Riteish Deshmukh Wedding Album : रितेश देशमुख आणि जिनिलिया यांची जोडी बॉलिवूडमधील क्युट जोडी आहे. नुकतेच त्यांच्या ख्रिश्चन पद्धतीने केलेल्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

रितेश देशमुख आणि जिनिलिया यांची जोडी बॉलिवूडमधील क्युट जोडी आहे. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते.

रितेश-जिनिलियाची लव्हस्टोरी एखाद्या बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही. या जोडप्याची पहिली भेट 'तुझे मेरी कसम'च्या सेटवर झाली होती. या चित्रपटाचे शूटिंग २००२ मध्ये सुरू झाले.

जिनिलियाने सुरुवातीला रितेशकडे दुर्लक्ष केलं होतं. रितेश हा श्रीमंत घरातील बिघडलेला मुलगा असल्याचं जिनिलियाला वाटायचं. पण पुढे त्यांच्यात मैत्री झाली.

'तुझे मेरी कसम' या चित्रपटानंतर त्यांनी 'मस्ती' या सिनेमात एकत्र काम केलं. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पण तरीही जेनेलिया लग्नासाठी तयार नव्हती.

रितेश आज ना उद्या राजकारणात जाईल, असे तिला वाटत होते. त्यामुळे लग्नासाठी होकार द्यायला तिने तब्बल ८ वर्षे लावली. पण रितेशपासून दूर राहणे तिलाही शक्य नव्हते. अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतलाच.

३ फेब्रुवारी २०१२ मध्ये रितेश आणि जिनिलिया लग्नबंधनात अडकले. त्यांचे लग्न ख्रिशन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीत झालं होतं.

रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

जिनिलिया ख्रिश्चन असल्यामुळे देशमुख कुटुंबीयांकडून या लग्नाला विरोध झाल्याचे सांगितले जाते. मात्र कालांतराने रितेश-जेनिलियाच्या नात्याला सगळ्यांची संमती मिळाली.

रितेश आणि जिनिलियाला दोन मुलं आहेत, ज्यांची नावं आहेत रियान आणि राहिल.