कबूल है कबूल है कबूल है ! गौहर खान आणि जैद दरबार अडकले लग्नाच्या बेडीत, लग्नाचे फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 15:19 IST2020-12-25T15:11:56+5:302020-12-25T15:19:25+5:30
गौहर खान आणि जैद दरबार आज लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. मुंबईच्या आईटीसी ग्रँड मराठा हॉटलमध्ये निकाह पार पडला.

मोठ्या थाटात हा निकाह संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती.
निकाह सेरेमनीमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
लग्नावेळी गौहरने सिल्वर आणि क्रीम कलरचा शरारा परिधान केला होता.
यावेळी नववधून गौहर खूपच सुंदर दिसत होती.
मांग टीका, नेकलेस आणि हेवी ईयररिंगमध्ये तिच्या सौंदर्यांला चांर चाँद लागले होते.
पति जैद दरबारही गौरहच्या लेहंगाशी मिळता जुळता साजेसा असा शेरवानी परिधान केला होता.
लग्नाचे फोटो समोर आल्यापासून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
लग्नाच्या फोटोमध्ये नववधू प्रार्थना गौहरचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे.
नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती या फोटोत पाहायला मिळतेय.
लग्नाच्या बेडीत अडकत दोघांनीही आयुष्याला नवीन सुरूवात केली आहे.
दोघांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत आहे.