'उंच माझा झोका' मालिकेतली छोटी रमा आठवतेय का?, लेटेस्ट फोटोत तिला ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 09:32 IST2023-08-07T09:28:16+5:302023-08-07T09:32:50+5:30

'उंच माझा झोका' या मालिकेचे दिग्दर्शक विरेन प्रधान यांची नुकतीच तेजश्रीसोबत भेट झाली. यानिमित्त त्यांनी तिच्याबरोबरचा एक सेल्फी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला.

छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या मालिका प्रसारीत होत असतात. या मालिकांपैकी काही मालिका प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करतात. या मालिका बंद झाल्या तरी रसिकांच्या मनात त्यांचं स्थान कायम करुन जातात. अशाच मालिकांपैकी एक मालिका म्हणजे उंच माझा झोका.

काही वर्षांपूर्वी उंच माझा झोका ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि खूप लोकप्रिय झाली. या मालिकेतून रमाबाई रानडे यांचा जीवन प्रवास रेखाटण्यात आला होता.

२०११ मध्ये झी मराठीवर 'उंच माझा झोका' ही मालिका प्रंचड लोकप्रिय झाली होती. या मालिकेतून रमाबाई रानडे यांचं चरित्र पहिल्यांदाच छोट्या दाखवण्यात आलं.

‘उंच माझा झोका’ या मालिकेत शरद पोंक्षे, कविता लाड, शैलेश दातार, शिल्पा तुळसकर प्रमुख भूमिकांमध्ये झळकले होते. मात्र साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं ते छोट्या रमाबाईंनी. या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका बालकलाकार तेजश्री वालावलकर हिने निभावली होती. तर रमाबाई रानडे यांच्या मोठेपणाची भूमिका स्पृहा जोशीने साकारली होती. या दोघींनाही प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते.

यातील बालकलाकार तेजश्री आता बरीच मोठी झाली आहे. तिला आता ओळखणंदेखील कठीण झालं आहे. मालिकेचे दिग्दर्शक विरेन प्रधान यांची नुकतीच तेजश्रीसोबत भेट झाली. यानिमित्त त्यांनी तिच्याबरोबरचा एक सेल्फी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला.

मालिकेत छोट्या रमाबाईंची भूमिका तेजश्री वालावलकरने साकारली होती. या मालिकेमुळे तेजश्री घराघरात पोहोचली. तिला नवी ओळख आणि लोकप्रियता लाभली. दरम्यान आता अनेक वर्षांनंतर या मालिकेच्या दिग्दर्शकांची आणि मालिकेतील काही कलाकारांची भेट झाली. विरेन प्रधान यांनी तेजश्रीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, उंच माझा झोका. छोटी रमा आता मोठी झाली. दिवस भरभर मोठे होतात. आता विरेन प्रधान यांच्या या पोस्टवर त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

तेजश्री वालावलकरचा लेटेस्ट फोटो पाहून चाहत्यांनी ही किती वेगळी दिसते. तसेच ती बदलली असली तरीही अजून तशीच क्युट आहे.अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.