लोकांना खळखळून हसविणारी भारती सिंग हळदीच्या दिवशी ढसाढसा रडली, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:04 IST2017-12-03T14:22:17+5:302018-06-27T20:04:06+5:30

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग हीचा आज हळद समारंभ उत्साहात पार पडला. हर्ष आणि भारती लवकरच विवाहाच्या बंधनात अडकणार असून, गोव्यामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा विवाहसोहळा पार पडत आहे. यादरम्यान भारतीने पिवळ्या रंगाचा गाउन परिधान केला होता. हळद समारंभ सुरू असतानाच भारती इमोशनल झाल्याचे दिसून आले. यावेळी तिचा होणारा पती हर्ष तिला आधार देताना दिसून आला.