शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१० वर्षांपासून एकाही सिनेमात मिळत नव्हतं काम, निराश Bobby Deolचं करिअर सलमानने आणलं जागेवर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 2:44 PM

1 / 7
चित्रपट अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) आणि सलमान खान (Salman Khan) हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र आहे. दोघंही काही वर्षांपूर्वी आलेल्या रेस ३ (Race 3) या चित्रपटात एकत्र दिसले होते.
2 / 7
बॉबी देओलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खानबद्दल मोठा खुलासा केला आहे. चित्रपटसृष्टीक पुनरागमन करण्यासाठी सलमान खाननं कशाप्रकारे आपल्याला मदत केली याबाबत त्यानं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं.
3 / 7
क्लास ऑफ ८३, आश्रम, लव्ह हॉस्टेल सारख्या चित्रपटांनी बॉबी देओलला एक नवी ओळख दिली आहे. त्यानं 'बरसात' या चित्रपटाच्या माध्यमातून लीड अॅक्टर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. परंतु एक वेळ अशी आली होती की बॉबी देओलला काम मिळणं बंद झालं होतं. याच काळाची त्यानं एका मुलाखतीदरम्यान आठवण काढली.
4 / 7
'चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्यासाठी सलमान खाननं मोठी मदत केली. तो एक चांगल्या मनाता व्यक्ती आहे. मी खरंच नशीबवान आहे की मी त्या लोकांपैकी आहे ज्यांच्यासाठी इतकं प्रेम आहे. जर त्यानं कोणाची काळजी घेतली, तर तो मनापासून ते करतो,' असं बॉबी देओलनं सांगितलं.
5 / 7
'सलमान खानमुळेच मी वर्क आऊट करण्यास सुरूवात केली. माझे वडील आणि भाऊ कायम वर्कआऊट करतात. परंतु मी कधीच ते केलं नव्हतं,' असंही तो म्हणाला.
6 / 7
'सलमाननं मला रेस ३ मध्ये संधी दिली होती. ती माझ्यासाठी आणि माझ्या करिअरच्या अनेक गोष्टींसाठी सुरूवात होती. सर्वांनीच मला मोठ्या कालावधीनंतर पाहिलं. तरुण पिढीनं मला पाहिलं नव्हतं आणि सलमानचा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो तेव्हा तो पाहण्यासाठी सर्वच जातात. रेस ३ नंतर मला हाऊसफुल ३ मिळाला आणि तरुण वर्गानं माझी नोंद घ्यायला सुरूवात केली,' असंही त्यानं स्पष्ट केलं.
7 / 7
बरसात या चित्रपटापासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या बॉबी देओलला पदार्पणाच्या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानं बादल, बिच्छू, सोल्जर, हमराज आणि अजनबी अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय साकारला. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्याला काम मिळालं नव्हतं. नुकताच तो 'लव्ह हॉस्टेल' मध्येही दिसला. त्याच्या अभिनयाची अनेकांनी प्रशंसाही केली.
टॅग्स :Salman Khanसलमान खानBobby Deolबॉबी देओलWebseriesवेबसीरिजbollywoodबॉलिवूड