'तू चाल पुढं' मालिकेतील अश्विनीचा झाला मेकओव्हर, तिच्या ग्लॅमरस लूकला मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 12:09 IST2023-01-28T12:05:39+5:302023-01-28T12:09:27+5:30
Tu Chaal Pudha : अश्विनी आता मिसेस इंडिया स्पर्धेत भाग घेणार आहे. तिचा या स्पर्धेतील ग्लॅमरस लूक समोर आला आहे.

झी मराठीवरील 'तू चाल पुढं' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अश्विनी वाघमारे आणि तिच्या कुटुंबाचा प्रवास मालिकेतून दाखवण्यात आला आहे.

या मालिकेतील अश्विनी घराघरात पोहचली. आता तिचा नवा प्रवास सुरु होणार आहे.

आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणारी, कुटुंब साभांळणारी आणि वेळी नवऱ्याला आपल्या बाजूनं कसं मनवायचं हे उत्तमरित्या माहिती असणारी अश्विनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या पसंतीस उतरली आहे.

या मालिकेत अश्विनीनं घरातील सगळ्यांचा विरोध पत्करून मोठ्या हिंमतीनं तिचं ब्युटी पार्लर सुरू केलं आहे. आता अश्विनीचा नवा प्रवास सुरु होणार आहे.

अश्विनी आता मिसेस इंडिया स्पर्धेत भाग घेणार आहे. तिचा या स्पर्धेतील ग्लॅमरस लूक समोर आला आहे.

नेहमी साडी आणि वेणीत दिसणारी अश्विनी सुंदर रेड गाऊन मध्ये दिसत आहे.

अश्विनीचे फोटो दर्शकांच्या पसंतीस उतरले असून आता अश्विनीचा नवा प्रवास मालिकेत पाहायला मिळणार आहे.

मालिकेतील या नव्या ट्विस्टला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

















