‘पठाण’ व ‘डंकी’नंतर शाहरूखचे हे सिनेमे तोडणार आरआरआर, केजीएफ 2 चे कमाईचे रेकॉर्ड!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 18:25 IST2022-04-21T17:41:47+5:302022-04-21T18:25:00+5:30

Shah Rukh Khan : ‘झिरो’ या चित्रपटानंतर शाहरूख खान दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावरून गायब होता. शाहरूखचं स्टारडम संपलं, असा अंदाज यावरून अनेकांनी बांधला होता. पण किंगखान ‘संपलेला’ नाहीये...!

लवकरच शाहरूखचा ‘पठाण’ हा सिनेमा येतोय आणि आता त्याच्या ‘डंकी’ या सिनेमाची घोषणाही झालीये. सध्या शाहरूखकडे सिनेमांची रांग आहे. त्याचे एकापाठोपाठ एक असे अनेक सिनेमे येत्या काळात चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत आणि हे सिनेमे 2000 कोटींची कमाई करतील असा अंदाज आहे.

सर्वप्रथम पठाण. या चित्रपटात शाहरूख जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. दीपिकाही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. पुढील वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

पठाण या चित्रपटानंतर शाहरूख राजकुमार हिरानींच्या ‘डंकी’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकतीच या सिनेमाची घोषणा झाली. यात शाहरूखसोबत तापसी पन्नू लीड रोलमध्ये आहे.

शाहरूख खानने ‘हे राम’चे राईट्स खरेदी केले आहेत. खुद्द कमल हासन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अर्थात या प्राजेक्टबद्दल अद्याप काहीही अपडेट नाहीत.

ऑपरेशन खुकरीवर आधारित एक चित्रपट शाहरूख घेऊन येतोय. तोच या चित्रपटाचा निर्माता आहे. यात तो एका सैनिकाची भूमिका साकारेल, अशी शक्यता आहे.

सॅल्यूट हा भारतीय हवाई दलाचे माजी वैमानिक राकेश शर्मा यांचं बायोपिक दीर्घकाळापासून चर्चेत आहे. आमिरने हा सिनेमा नाकारला. पण शाहरूख या चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे.

रईस या चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांच्यासोबत आणखी एक सिनेमा शाहरूख घेऊन येतोय. फायर फाईटर तुकाराम यांच्यावर आधारित सिनेमासाठी शाहरूखने ढोलकियासोबत हातमिळवणी केली आहे.

साऊथचे दिग्गज दिग्दर्शक एटली यांचा एक सिनेमा शाहरूखने साईन केला आहे. याचं टायटल सनकी वा लायन असू शकतं. या चित्रपटाचा बजेट 200 कोटींचा असल्याचं कळतंय.

शाहरूखचा चक दे हा आयकॉनिक सिनेमा. या सिनेमाचे दिग्दर्शक शिमित पुन्हा एकदा शाहरूखसोबत काम करण्यास उत्सुक आहेत. हा एक रोमॅन्टिक सिनेमा असेल, अशी माहिती आहे.