शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Photo: अभिज्ञाचा व्हेकेशन मूड ऑन; अबूधाबीतील प्रसिद्ध मशिदीला दिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 6:25 PM

1 / 9
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे.
2 / 9
कलाविश्वात सक्रीय असलेली अभिज्ञा सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
3 / 9
सध्या सोशल मीडियावर अभिज्ञाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून अभिज्ञा व्हेकेशनसाठी रवाना झाल्याचं दिसून येत आहे.
4 / 9
अभिज्ञाचा पती मेहूल पै याने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यावरुन ही जोडी अबुधाबीला व्हेकेशनसाठी गेल्याचं दिसून येत आहे.
5 / 9
अभिज्ञाने अबुधाबीतील प्रसिद्ध मशिदीलाही भेट दिली. सोबतच तेथील काही फोटो शेअर केले आहेत.
6 / 9
अभिज्ञाने शेख झायेद ग्रँड या मशिदीला भेट दिली. यावेळी तिच्यासोबत मेहूल आणि तिची आईदेखील होती.
7 / 9
यावेळी अभिज्ञाने राखाडी रंगाचा ड्रेस परिधान केला असून त्यावर पांढऱ्या रंगाची ओढणी घेतली आहे. तर मेहुलने सुद्धा अभिज्ञाला मॅचिंग असा राखाडी रंगाचा शर्ट घातला आहे.
8 / 9
अलिकडेच अभिज्ञा तू तेव्हा तशी मालिकेत दिसली होती.
9 / 9
२०२२ हे वर्ष अभिज्ञा भावे साठी खूप संघर्षदायी ठरलं. मेहुलला कॅन्सरचं निदान झालं होतं. मात्र, या गंभीर आजारावर त्याने यशस्वीरित्या मात केली.
टॅग्स :Abhidnya Bhaveअभिज्ञा भावेCelebrityसेलिब्रिटीTelevisionटेलिव्हिजन