आशका गोराडियाला लागलं योगाचं व्यसन, समुद्राकाठी केलेल्या भन्नाट योगा मुव्हज पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 08:00 IST2021-07-04T08:00:00+5:302021-07-04T08:00:00+5:30
अनेक सेलिब्रिटी त्यांचे वर्कआउटचे आणि योगासनाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांनाही फिट राहण्याचं आवाहन करत असतात. अशात अभिनेत्री आशका गोराडियाच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकली तर तिला योगाचं व्यसन लागल्याचंच दिसतं.

अनेकदा आशका योगा समुद्राकाठी करताना दिसते.
बंदिस्त जागेत योगा न करता मोकळ्या जागेत योगा करण्याला ती सर्वात जास्त पसंती देते.
त्यामुळे अनेकदा समुद्रकाठी कठिण आसनं करताना ती दिसते.
नुकतेच आशकाने तिच्या योगासनांचे नवी फोटो शेअर केले आहेत.
बिकीनमध्ये योगा करताना ती दिसत आहे.
नित्यनियमाने योगा ती करते.
तिची दिवसाची सुरुवातच योगाने ती करते.
अवघड आणि तेवढीच भन्नाट योगासनं आशका अगदी सहज करते.
विशेष म्हणजे आशका फक्त एकटीच योगासन करत नाही.
तर आशकाचा पती ब्रेंट गोबललाही योगाची आवड आहे.
अनेकदा दोघेही एकत्र योगा करत इतरांना योगा करण्याची प्रेरणा देत असतात.