फेस्टिव्ह सीझनमध्ये असा करा एकदम भारी ट्रेडिशनल लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 03:10 PM2019-10-11T15:10:52+5:302019-10-11T15:14:22+5:30

'गोल्ड' सिनेमातून अक्षयकुमारसोबत बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणारी अभिनेत्री मौनी रॉय तिच्या लूकमुळे सध्या चर्चेत आली आहे.

सण-समारंभाच्या काळात मौनीप्रमाणेच एकदम भारी ट्रेडिशनल लूक नक्की ट्राय करा.

प्लेन साडी अनेकांना आवडत नाही मात्र व्हाईट गोल्ड प्लेन साडी क्लासी लूक देते. रेड कलरचं प्लेन ब्लाउज, चोकर नेकलेस आणि इअररिंग्स यामध्ये मौनी खूपच सुंदर दिसत आहे.

सध्या बांधनी लूकचा ट्रेंड आहे. फेस्टिव सीजनमध्ये पिंक बांधनी लहंगा तुम्हीही ट्राय करू शकता.

सणांना डिझायनर साडी देखील ट्राय करू शकता. मौनीने व्हाईट साडीसोबत हॉल्टर नेक लूक असलेलं ब्लाउज परिधान केलं आहे.

लग्न समारंभात प्रामुख्याने शरारा परिधान केला जातो. मौनीचा लूक एकदम भारी आहे. त्यामुळे फेस्टिव्ह सीझनसाठी तिची फॅशन फॉलो करायला काही हरकत नाही.

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. तरुणाईने ही खरेदीसाठी गर्दी केली आहे. सण समारंभात ट्रेडिशनल आणि हटके क्लासिक लूक करण्याकडे सर्वांचा कल असतो.

टॅग्स :फॅशनfashion