करिना कपूरसारखा जंपसूट ट्राय करून असं दिसा स्टायलिश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 02:52 PM2019-10-19T14:52:10+5:302019-10-19T14:55:13+5:30

कपड्यांमध्ये सातत्याने नवनवीन ट्रेंड येत असतात. त्यामुळे कपाटात नेहमीच सर्वांना नवीन कपडे हवे असतात.

पार्टीमध्ये स्टायलिश लूक करायचा असल्यास करिनाची फॅशन फॉलो करता येईल.

सध्या अभिनेत्री करिना कपूरच्या फ्लोरल प्रिंट जंपसूटची खूपच चर्चा रंगली आहे. तुम्हीही असा जंपसूट नक्की ट्राय करू शकता.

एका शोसाठी करिनाने पिवळ्या रंगाचा जंपसूट परिधान केला होता. त्यावर लाल आणि गुलाबी रंगाची फ्लोरल प्रिंट होती.

जंपसूटमुळे क्लासिक लूक येतो. यासोबतच करिनाने सुंदर मेकअप केला आहे.

जंपसूटचा खालचा भाग हा प्लेन असल्याने प्लीट्स स्टाईलवर ते स्टिच करण्यात आल्या आहेत. यामुळे त्याला हटके लूक येत आहे.

करिनाचा प्रत्येक लूक एकदम भारी असतो. त्यामुळे तिची फॅशन फॉलो करायला काही हरकत नाही.

टॅग्स :फॅशनfashion