लग्नाची खरेदी करताय? बॉलिवूड अभिनेत्रींचे 'हे' लूक्स करतील मदत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 19:19 IST2018-11-01T19:12:52+5:302018-11-01T19:19:07+5:30

सध्या लग्नसराईला सुरूवात झाली असून त्यासाठी शॉपिंगसोबतच इतर गोष्टींची तयारी सुरू आहे. या तयारीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वधू-वराचा हटके लूक. आपल्या लग्नामध्ये आपण सर्वांपेक्षा वेगळं दिसावं हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. त्यासाठी फॅशन वर्ल्डमध्ये सुरू असलेले ट्रेन्ड लक्षात घेऊन तयारी कली जाते. लग्नासाठी खरेदी करत असलेले दागिने, लग्नामध्ये परिधान करण्यात येणारे कपडे यांबाबत फार विचारपूर्वक निर्णय घेण्यात येतात. याबाबत अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटींना फॉलो करण्यात येतं. आज आपण अशाच बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्या रिअल लाइफमधील लग्नामध्ये केलेले लूक्स पाहणार आहोत. तुम्हीही लग्नासाठी खरेदी करत असाल तर त्यांचे हे लूक्स ट्राय करू शकता.