Lokmat Most Stylish Awards 2021: तारे जमीन पर! मोस्ट स्टायलिश ताऱ्यांचा सन्मान; दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 12:28 PM2021-12-03T12:28:12+5:302021-12-03T12:38:19+5:30

Lokmat Most Stylish Awards 2021: चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या, अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या कलाकारांचा लोकमतकडून सन्मान

लोकमतकडून आयोजित करण्यात आलेला मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळा काल मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्याला अनेक दिग्गजांची उपस्थित होती. आपल्या स्टायलिश अंदाजानं वेगळी छाप पाडणाऱ्या कलाकारांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.

अनेक सुपरहिट सिनेमे देणारा दिग्दर्शक रोहित शेट्टीचा मोस्ट स्टायलिश डायरेक्टर अँड टीव्ही होस्ट म्हणून सन्मान करण्यात आला.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मोस्ट स्टायलिश फॅशन आयकॉन म्हणून गौरवण्यात आलं.

अभिनेत्रा सिद्धार्थ मल्होत्रा मोस्ट स्टायलिश ॲक्टर ऑफ द इयर पुरस्काराचा मानकरी ठरला. सिद्धार्थनं शेरशहा चित्रपटात साकारलेली कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती.

अभिनेते मनोज वाजपेयींचा मोस्ट स्टायलिश व्हर्सटाईल ऍक्टर म्हणून सन्मान करण्यात आला. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील फॅमिली मॅन या वेबसीरिजमध्ये वाजपेयींनी केलेला अभिनय सर्वांच्याच पसंतीस उतरला. त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं.

मराठी चित्रपटसृष्टीपासून सुरुवात करत बॉलिवूडपर्यंत झेप घेणारा अभिनेता सिद्धार्थ जाधवचा मोस्ट स्टायलिश एंटरटेनर म्हणून गौरव करण्यात आला. सिंबा, सूर्यवंशी या चित्रपटात सिद्धार्थनं केलेल्या कामाचं बॉलिवूडमध्ये अनेकांनी कौतुक केलं.

अभिनेत्री सारा अली खानला मोस्ट स्टायलिश पॉवर हाऊस परफॉर्मर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

बोल्डनेसमुळे चर्चेत असणाऱ्या, पॉर्नस्टार ते बॉलिवूड असा प्रवास केलेल्या सनी लिओनीला मोस्ट स्टायलिश फॅशनिस्टा पुरस्कारानं गौरवण्यात आलं. विशेष म्हणजे पुरस्कार स्वीकारल्यानंतर सनी मराठीत बोलली.

एकापेक्षा एक सुंदर गाणी गाऊन श्रोत्यांच्या मनात घर करणारा अरमान मलिक मोस्ट स्टायलिश सिंगर पुरस्काराचा मानकरी ठरला. यावेळी त्यानं त्याच्या सुरेल आवाजात बार बार देखो चित्रपटातील सौ आसमान गाणं सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली.

अभिनेत्री सई ताम्हणकरला मोस्ट स्टायलिश ऍक्ट्रेस फॉर कॉन्ट्रिब्युशन इन रिजनल सिनेमा पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

अभिनेत्री अनन्या पांडेला मोस्ट स्टायलिश ग्लॅमर आयकॉन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.