Jasprit Bumrah Rumored Girlfriend Kissing Scene: क्रिकेटपटू बुमराहशी रंगली होती अफेयरची चर्चा; आता किंसिंग व्हिडीओने उडवला धुरळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 08:16 PM2022-01-13T20:16:43+5:302022-01-13T20:32:29+5:30

'ती' बुमराहची गर्लफ्रेंड असल्याच्या अफवा पसरल्या होत्या, पण बुमराहने लग्न केल्यानंतर चर्चांना पूर्णविराम मिळाला.

भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांची प्रेमप्रकरणं यांच्या बातम्या चाहते अगदी चवीने वाचतात. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचंही लग्नाआधी एका अभिनेत्रीसोबत नाव जोडण्यात आलं होतं.

काही वेळा भारतीय क्रिकेटपटू एखाद्या ठिकाणी एखाद्या मुलीबरोबर किंवा अभिनेत्रीबरोबर दिसतात. त्यानंतर त्या दोघांमध्ये प्रेम प्रकरण किंवा अफेयर असल्याची चर्चा रंगते. बुमराह किंवा त्या अभिनेत्रीने याबद्दलच कधीही उघडपणे वाच्यता केली नाही. ती अभिनेत्री म्हणजे साऊथ चित्रपटांची अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन.

अनुपमा आणि जसप्रीत बुमराह यांच्यात प्रेम प्रकरण सुरू असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. पण अखेर बुमराहने मात्र स्पोर्ट्स अँकर आणि प्रेझेंटर संजना गणेशन हिच्याशी लग्न केलं आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला.

त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असला तरी आता अनुपमा एका किसिंग सीनमुळे चर्चेत आली आहे.

अनुपमाने आतापर्यंत केलेल्या चित्रपटांमध्ये एकदाही ऑन स्क्रीन किसिंग सीन चित्रित केला नव्हता. पण आगामी रावडी बॉईज या चित्रपटात मात्र तिने ऑन स्क्रीन किसिंग केलं असल्याने ती चांगलीच चर्चेत आली आहे.

रावडी बॉईज या चित्रपटात प्रोड्युसर दिल राजूचा भाचा असलेल्या आशिष रेड्डीसोबत ती अभिनय करत आहे. या चित्रपटात तिने पहिला ऑन स्क्रीन किस दिला आहे.

आशिष रेड्डी याचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्याच चित्रपटात अनुपमाने आपला किसिंग सीन चित्रित केल्यामुळे चाहते मात्र काही अंशी नाराज झाल्याची चर्चा आहे. अनुपमाने चित्रपटात सोज्वळ भूमिका केल्या असल्याने तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना फारसा रुचलेला दिसत नाहीये.